Home /News /mumbai /

प्रेमात नवरा ठरला अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीच्या छातीत खुपसला चाकू, मुंबईतील घटना

प्रेमात नवरा ठरला अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीच्या छातीत खुपसला चाकू, मुंबईतील घटना

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

मुंबई, 23 मे : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील (mumbai) गोवंडीत घडली आहे. प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची (wife killed his husbend) एका पत्नीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील गोवंडी परिसरातील बैगनवाडी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेनं नाव नजीरा (वय 32) असून तिच्या प्रियकराचे नाव सदर आलम आहे. या दोघांनी मिळून नजीराचा पती इरफान खान (वय 34) याचा खून केला आहे. गोवंडीतील बैगनवाडी परिसरात नजिरा ही इरफान खान याच्यासोबत राहत होती. गुणगोविंदाने दोघांचा संसार सुरू होता. अलीकडच्या काळात आरोपी नजिरा बानो आणि आलम याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघांच्या प्रेमात तिचा पती अडथळा येत होते. दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता. शनिवारी पहाटे तिघांमध्ये असाच वाद झाला. यावेळी नजिराने इरफानच्या छातीत चाकू खुपसला. चाकूचा वार वर्मी लागल्यामुळे तो जागेवरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. (अंजिक्य राऊतचं इन्स्टावर जोरात कमबॅक, असं परत मिळवलं हॅक झालेलं अंकाऊट) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. शिवाजी नगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास या प्रकरणात पोलीस करत आहेत. पत्नीला वाचवताना नवऱ्याचा मृत्यू दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीची अब्रू वाचवताना अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात जोगवा मागण्याचा काम करणाऱ्या पोतराजाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्या अज्ञात हल्लेखोराला शोधण्यासाठी लोकल क्राईम ब्रँचचे पथक खेडमध्ये दाखल झाले आहे. श्वान पथकाद्वारे देखील तपासाला सुरवात झाली आहे . (BREAKING : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात CBI ने 4 फरार आरोपींनी केली अटक) पत्नीची अब्रू वाचवत गंबीर जखमी होऊन मृत झालेल्या पोतराजचे नाव सुरेश कोले आहे. तो मूळ कर्नाटक येथील आहे. जोगवा मागून उदरनिर्वाह करण्यासाठी  तो रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या पत्नीसह आला होता. गावोगावी फिरून जोगवा मागणाऱ्या पोतराज  काम करणारे एक दाम्पत्य भरणे येथे शनिवारी झोपले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोतराजच्या पत्नीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. जाग आल्यानंतर त्याला तिच्या नवऱ्याने हटकले त्यावेळी रागाच्या भरात त्या अज्ञात व्यक्तीने त्या महिलेच्या नवऱ्याच्या डोक्यात घाव घातला. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी त्याचे निधन झाले. संबंधित हल्लेखोरांवर भादंवि कलम ३०२ हा खुनाचा तसेच ३५४ अन्वये विनयभंगणंगच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे. खेड पोलिसांबरोबरच रत्नागिरी येथील लोकल क्राईम ब्रँचचे एक पथक खेडमध्ये त्या हल्लेखोराला शोधण्यस्तही दाखल झाले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या