Home /News /entertainment /

'मन उडू उडू झालं' फेम Ajinkya Raut चं Instagram वर जोरात कमबॅक, असं परत मिळवलं हॅक झालेलं अंकाऊट

'मन उडू उडू झालं' फेम Ajinkya Raut चं Instagram वर जोरात कमबॅक, असं परत मिळवलं हॅक झालेलं अंकाऊट

अजिंक्यचे ( Ajinkya Raut Instagram hacked ) काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अंकाऊट हॅक झाले होते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.

  मुंबई, 23 मे- झी मरीठीवरी मन उडू उडू झालं (Mann Udu Udu Zala ) ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. मालिकेत इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत ( Ajinkya Raut) साकारताना दिसतो. अंजिक्य सोशल मीडियावर नेहमी अक्टीव्ह असतो. रिल्स, व्हिडिओ, मालिकेतील ऑफस्क्रिन धमाल व्हिडिओ तो शेअर करत असतो. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याच प्रयत्न करतो. पण मागच्या काही दिवासांपासून तो सोशल मीडियावर दिसत नव्हता.त्याला कारणही तसेच होते, अजिंक्यचे ( Ajinkya Raut Instagram hacked ) काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अंकाऊट हॅक झाले होते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. त्याचे इन्स्टा अंकाऊट त्याला (Ajinkya Raut Instagram ) परत मिळाले आहे. अंजिक्य राऊतनं नुकताच इन्स्टाला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने कशापद्धतीनं त्याचं फेसबुक आणि इन्स्टा अंकाऊ हॅक झाल्याची माहिती दिली आहे. अशा कोणत्याच लिंकवर क्लिन न करण्याचे आवाहन देखील त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. मी आता इन्स्टावर परत आलो आहे असं म्हणत त्याने चाहत्यांसोबच आनंदाची बातमी शेअर केली आहे. वाचा-'जाडी कमी करण्यासाठी पिझ्झा खाण्यापेक्षा...' आशा भोसलेंनी महिलांना दिल्या टिप्स अंजिक्यनं या व्हिड़िओसोबत एक पोस्ट देखील केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, खूप प्रेम..सायबर सेल, झी मधील आयटी प्रोफेशनल आणि मुख्यतः @harshitmhatres च्या मदतीने मी माझ्या Instagram च्या त्याच प्रोफाईलने परत आलो आहे. ..मी परत आलो आहे. " ajinkyathoughts"याचं युजरनेमने... प्रेमाने भरलेल्या त्या 1000 फॅन पेजेसला टॅग करणे शक्य नाही.. पण त्यातील काहींना टॅग करण्याचा प्रयत्न करत आहे...कृपया तुमच्या इन्स्टा स्टोरी आणि रील्स मला शेअर करा. मी आता माझ्या इंस्टाग्राम अकाउंट "ajinkyathoughts" वर परत आलो आहे. अंजिक्यच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. वाचा-'रानबाजार' साठी माधुरी पवारनं केलं टक्कल, प्रेरणा पाटीलच्या लुकची होतेय चर्चा! गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांचे इन्स्टा अंकाऊट हॅक झाले आहेत. याचा फटका अजिंक्य राऊत यालाही बसला होता. अजिंक्यचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं होतं. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हॅकर्सने ताबा मिळवला होता. ही गोष्ट लक्षात येताच अजिंक्यने त्याचे पेज डिअक्टीव्ह केलं होतं.
  सध्या या मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. मालिकेतील ही जोडी सोशल मीडियावर अनेक रिल्स बनवून लक्ष वेधून घेत असते. अजिंक्यही त्याचे पर्सनल फोटो शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. पण आता त्याचे इन्स्टा अंकाऊट हॅक झाल्याने तो सोशल मीडियावरील काही दिवस तरी दिसणार नाही.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या