मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /विनोद कांबळीचा नवा राडा, पत्नीने केली पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

विनोद कांबळीचा नवा राडा, पत्नीने केली पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

विनोद कांबळीने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा केला आरोप अँड्रियाने केला आहे.

विनोद कांबळीने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा केला आरोप अँड्रियाने केला आहे.

विनोद कांबळीने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा केला आरोप अँड्रियाने केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : वेगवेगळ्या वादामुळे कायम चर्चेत राहणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. विनोद कांबळीच्या विरोधात त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद कांबळीविरोधात त्याची पत्नी अँड्रियाने पोलिसात तक्रार दिली होती. विनोद कांबळीने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा केला आरोप अँड्रियाने केला आहे. त्यानुसार, IPC 324 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप अटक केलेली नाही. या प्रकरणाची अधिक तपास पोलीस करत आहे.

कारकीर्द राहिली वादात

विशेष म्हणजे, विनोद कांबळी आणि वाद हा नवीन विषय नाही. याआधीही विनोद कांबळीला पोलिसांनी अटक केली होती. मागील वर्षी मार्च 2022 मध्ये कांबळीने मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला टक्कर मारली, याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली होती.

(कुणी काम देतं का काम..,कोट्यवधीचा मालक विनोद कांबळी आला रस्त्यावर, दिवसाची कमाई फक्त 1000 रुपये!)

विनोद संपूर्ण दारूच्या नशेत होता. तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो. विनोदला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर या कारमालक आणि काही सदस्यांशी वाद घालताना विनोद दिसून आला. या प्रकरणी विनोद कांबळीला अटक झाली होती आणि या अटकेनंतर त्याची जामिनावरही सुटका करण्यात आली.

(विनोद कांबळींचा दारूच्या नशेतील Video Viral, पाहा कशी होती क्रिकेटपटूची अवस्था!)

विनोद कांबळी भारताकडून 17 टेस्ट खेळला, यात त्याने 54 च्या सरासरीने 1084 रन केले आणि 4 शतकं तसंच 3 अर्धशतकही ठोकली. वनडेमध्ये त्याने 97 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 2477 रन केले, ज्यात 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कांबळीने 35 शतकांसह 9,965 रन केले.विनोद कांबळी याआधीही वादात सापडला होता. 2015 साली तो आणि त्याच्या पत्नीवर मोलकरणीचा छळ केल्याचा आरोपही झाला होता. यानंतर दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. पण कांबळी आणि त्याची पत्नी हेविटने मोलकरणीवर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला.

First published:

Tags: Vinod kambli, Vinod Kambli wife