मराठी बातम्या /बातम्या /Viral /विनोद कांबळींचा दारूच्या नशेतील Video Viral, पाहा कशी होती क्रिकेटपटूची अवस्था!

विनोद कांबळींचा दारूच्या नशेतील Video Viral, पाहा कशी होती क्रिकेटपटूची अवस्था!

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला (Vinod Kambli) रविवारी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. रविवारी दुपारी कांबळीने मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला टक्कर मारली. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई, 2 मार्च : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला (Vinod Kambli ) रविवारी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. रविवारी दुपारी कांबळीने मुंबईतल्या त्याच्या सोसायटीच्या गेटवर कारला टक्कर मारली, याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्याची जामिनावरही सुटका करण्यात आली. विनोद कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

लाल शर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे. विनोद संपूर्ण दारूच्या नशेत असून तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो. विनोदला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर या कारमालक आणि काही सदस्यांशी घालताना विनोद दिसत आहे. तिसरा व्हिडीओ एका पार्किंगमधील असून त्यामध्ये विनोद पोलिसांसोबत आहे.

वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार विनोद कांबळीवर आयपीसी धारा 279 (जलद ड्रायव्हिंग), 336 (दुसऱ्यांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात टाकणं) आणि 427 (नुकसान पोहोचवणं) हे आरोप लावण्यात आले आहेत. 50 वर्षांच्या विनोद कांबळीने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डही केले आहेत, तसंच तो सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र आहे.

ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्यानं दुर्घटना; कधीही पाहिला नसेल इतका भयानक अपघात, VIDEO

विनोद कांबळी भारताकडून 17 टेस्ट खेळला, यात त्याने 54 च्या सरासरीने 1084 रन केले आणि 4 शतकं तसंच 3 अर्धशतकही ठोकली. वनडेमध्ये त्याने 97 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 2477 रन केले, ज्यात 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कांबळीने 35 शतकांसह 9,965 रन केले.विनोद कांबळी याआधीही वादात सापडला होता. 2015 साली तो आणि त्याच्या पत्नीवर मोलकरणीचा छळ केल्याचा आरोपही झाला होता. यानंतर दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. पण कांबळी आणि त्याची पत्नी हेविटने मोलकरणीवर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला.

First published:

Tags: Mumbai Poilce, Video viral, Vinod kambli