मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'यांना मस्ती आलीये, कुठे हनिमून सुरू आहे?' अमृता फडणवीसांची अनिल देशमुखांवर टीका

'यांना मस्ती आलीये, कुठे हनिमून सुरू आहे?' अमृता फडणवीसांची अनिल देशमुखांवर टीका

'तुम्ही जसे वागला तसे आरोप तुमच्यावर होईल. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप केले, मग तुमच्यावरही आरोप होणारच'

'तुम्ही जसे वागला तसे आरोप तुमच्यावर होईल. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप केले, मग तुमच्यावरही आरोप होणारच'

'तुम्ही जसे वागला तसे आरोप तुमच्यावर होईल. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप केले, मग तुमच्यावरही आरोप होणारच'

    मुंबई, 20 ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर (mva government) टीकास्त्र सोडले आहे. 'यांना मस्ती आली आहे, यांचे हनिमून चालू आहेत, कुठे लपले आहे' असं म्हणत अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर विखारी टीका केली आहे. 100 कोटी जनतेला लस देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन आणि आभार प्रकट करण्यासाठी माधवबाग व्हॅक्सिन सेंटर सी पी टँक येथे माधवबाग मंदिर प्रांगणात  100  दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्यांच्या हस्ते केक कापून मोदींचे आभार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. VIDEO : रोहनप्रीतच्या गळ्याला लावला चाकू...; लग्नाच्या वाढदिवसाआधीच भयानक कृत्य 'यांना मस्ती आली आहे, एक माजी पोलीस आयुक्त आहे, तर दुसरीकडे माजी गृहमंत्री आहे, त्यांचे कुठे हनिमून चालले आहेत ते आपल्याला माहिती नाही. हे व्हायला नको हवे आहे. तुम्हाला कुठे जर दिसत असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे,  अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. इथं लोक ड्रग्स घेऊन फिरतात हे कारण लोकांनी दिलं आहे. यावर काम करावं की नाही करावं. महाराष्ट्र हा प्रगतीच्या दृष्टीने पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल व्हावा, हे आपल्यालाच ठरवायचं आहे.  यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. जी लोक सापडली त्यांना अटक करावी, पण असं नाही की तरुण मुलं सापडली तर त्यांना जेलमध्ये टाकावं, त्यांचं समुपदेशन करणे गरजेचं आहे. हे ड्रग्स येते कुठून त्याचा शोध लागला पाहिजे. त्या तरुणाला तुरुंगाची नाही तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. मावळ गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश,अजितदादा भारावले 'सरकार लसीकरणाबाबत कायम राजकारण करतंय हे त्यांचे नेहमी सुरू राहणार आहे. सामनातून भाजपवर टीका होणार नाही तर शिवसेनेचे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच वसुली सरकार चालणार कसे, अशी टीकाही अमृता फडणवीस यांनी केली. तसंच, तुम्ही जसे वागला तसे आरोप तुमच्यावर होईल. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप केले, मग तुमच्यावरही आरोप होणारच, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Amruta fadanvis, Anil deshmukh

    पुढील बातम्या