मावळ, 20 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh ) लखीमपूरमध्ये (lakhimpur kheri case) शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले होते. या प्रकरणी निषेध म्हणून शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेसने (congress) महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदला विरोधी म्हणून भाजपने मावळ गोळीबार प्रकरणाची (maval firing on farmers) आठवण करून दिली होती. तर दुसरीकडे आता मावळ गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत मावळ गोळीबारातील जखमी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रवेश केला. 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या काही जखमी शेतकरी देखील राष्ट्रवादीत दाखल झाले. या शेतकऱ्यांचं अजितदादांनी आभार मानले.
VIDEO : रोहनप्रीतच्या गळ्याला लावला चाकू...; लग्नाच्या वाढदिवसाआधीच भयानक कृत्य
'भाजपमध्ये आयुष्य घालवलेले अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये आले. त्यांचे डोळे पाणवले. पण मला तेव्हा काहींनी बदनाम करण्याचं काम केलं. मी कधी चुकीचं राजकारण केलं नाही. शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे. मात्र आज त्यातील जखमी शेतकरी राष्ट्रवादीमध्ये आले. मला बरं वाटलं, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
'उगाच हनुमानाची शेपटी कशी मोठी असते तशी ह्यांची मागणी संपतच नाही. आधी जे भूमिपूजन केलंय ते तरी पूर्ण होऊ दे म्हटलं. असं म्हणत करोडो रुपयांचा निधी दिलाय, पण कामं निटनेटकीच झाली पाहिजेत. असं म्हणत नेहमी निधीचा मागणी करणाऱ्यांचे अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये कान टोचले.
'तिसऱ्या लाटेच संकट नको. म्हणून मास्क लावा. तिसरी लाट आली तर परिस्थिती बिकट होईल. कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी तुडवल्याने अजित पवारांनी सर्वांना ठणकावून सांगितले.
कोरोना लसीकरण विक्रमाआधी आली चिंताजनक बातमी; मोदी सरकारने केला मोठा खुलासा
तसंच, पेट्रोल-डिझेल 100 पार केली. घरगुती गॅस महागला. केंद्र सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. शेतकरी एक वर्ष झाले दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. परंतु त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार नाहीत, अशी टीकाही अजितदादांनी केंद्रावर केली.
दरम्यान, सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अक्षरशः कोरोना नियमांना तिलांजली दिली गेली. सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडालेला आहेच पण काहीच्या तोंडाला मास्क नाही. दुपारच्या लोणावळ्यातील कार्यक्रमात झालेल्या गर्दी आणि नियमांना घातलेल्या तिलांजलीवरून अजित पवारांनी उघड नाराजी व्यक्त केली. बाबांनो मास्क वापरा अशी विनंतीच अजित पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अजित पवार