मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत 33 आमदारांना घेऊन मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आता या आमदारांच्या सह्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सह्या करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गुवाहटीला जाण्यापूर्वी या सह्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या सह्या कशासाठी करण्यात आल्या याबाबत ठोस माहिती मिळालेली नसून याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, सुरतमध्ये (Surat News) असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट (Airlift to MLAs) केल्याचं समोर आलं आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्टकरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार रात्री उशिरा सर्व आमदारांना एअरलिफ्ट करण्यात आलं.
गुवाहाटीला जाण्यापूर्वी काय-काय घडलं?सह्या करतानाचा व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/HVt7MqycyJ
— News18Lokmat (@News18lokmat) June 22, 2022
बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये, यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे वाचा - शिवसेना आमदार उडाले भुर्रर्र…; आता गुवाहाटी ठरणार महाराष्ट्राच्या सत्ताबदलाचा पट समोर आलेला हा व्हिडिओ गुवाहटीला निघण्यापूर्वीचा असून याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहे. या समर्थनासाठी आहेत की, अन्य कोणत्या कामासाठी आहेत याविषयी चर्चा होत असली तरी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार या सह्या बोर्डिंग पासवरील आहेत. गुवाहटीला निघण्यापूर्वी हे बंडखोर आमदार बोर्डिंग पासवर सह्या करतानाचा हा व्हिडिओ असल्याचे आमच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे.