मुंबई, 24 मार्च : मुंबईमध्ये स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीनंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय पडसाद उमटणार आहेत, याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.
राज्यात एका बाजूला महा विकासआघाडी सरकारमध्ये व्यवस्थित सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला तर अधिवेशन संपण्यापूर्वी शिवसेनेचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या पोलीस विभागातील सचिन वाझे यांना निलंबन करावा लागला तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पदावरून हटवत बदली करण्याची नामुष्की महाविकास आघाडी सरकारवर आली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या सर्व वादग्रस्त विषयांची चर्चा सुरू असतानाच विरोधकांनी गृहमंत्री आणि देशमुख यांच्यावर वेगवेगळे आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी गृहमंत्री आणि देशमुख यांच्या विभागातील बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयची मागणी केंद्र सरकारचे गृह सचिव यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात त्यांनी मोठ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच राजकीय नेते गुंतले याची शक्यता देखील वर्तविली असून या संबंधित पुरावे केंद्रीय गृह विभागाचे सचिव यांच्याकडे सादर केले आहेत.
तर दुसरीकडे उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्री यांनी शंभर कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करत थेट या प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सगळीकडे या सुनावणीत काय होते याकडेच लक्ष आहे.तसंच राज्याचे विरोधी पक्षनेते आज सकाळी भाजपाच्या आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेत आहेत.
या सर्व राजकीय घडामोडी होत असतानाच आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. संपूर्ण राज्यात आणि देशात महाविकास आघाडी सरकारची आणि गृह विभागाची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असतानाच आज कॅबिनेट बैठक यासंदर्भात काही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच आज संध्याकाळपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बापरे! एक कप चहाची किंमत 1000 रुपये! चहाप्रेमींनी नक्की वाचा काय आहे खासियत
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची बैठक झाली असून यात राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा काँग्रेस हायकमांड देण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीत काही नेत्यांनी राज्यात सुरू असलेल्या प्रकारावरून नाराजी देखील व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतेही भाष्य केले नाही. सोमवारी रात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मुंबईतील क्राइम ब्रांच विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याचे सिटी ऑर्डर काढण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीनंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते पडसाद आहेत का याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Hiren mansukh, Mumbai, Paramvir sing, Sachin vaze, Uddhav thackarey