मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! एक कप चहाची किंमत 1000 रुपये! चहाप्रेमींनी नक्की वाचा काय आहे खासियत

बापरे! एक कप चहाची किंमत 1000 रुपये! चहाप्रेमींनी नक्की वाचा काय आहे खासियत

एका चहाची किंमत (Tea Price) किती असू  शकते असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर अगदी ५ रुपयांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त ते शंभर रुपयांपर्यंत पोहोचेल. मात्र, एका दुकानात (Tea Stall) हा चहा चक्क 1000 रुपयांना विकला जातो.

पुढे वाचा ...

कोलकाता 24 मार्च : बंगाल सध्या विधानसभा निवडणूकीमुळे (West Bengal Elections) चर्चेत आहे. राज्यात भाजप आणि तृणमूलने आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे. अशात आता बंगालमधील एक चहाचं दुकानंही (Tea Stall) चर्चेत आलं आहे. या दुकानाच्या चर्चेच कारण आहे इथे विकला जाणार अत्यंत महान चहा. एका चहाची किंमत किती असू शकते असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर अगदी ५ रुपयांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त ते शंभर रुपयांपर्यंत पोहोचेल. मात्र, कोलकातामध्ये (Kolkata) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका दुकानातील एक कप चहाची किंमत चक्क एक हजार रुपये इतकी आहे. हे दुकान स्थानिक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.

कोलकातामध्ये राहाणाऱ्या पार्थ प्रतिम गांगुली यांचं मुकुंदपूरमध्ये चहाचं दुकान आहे. त्यांच्या दुकानात 12 रुपये प्रति कपपासून 1000 रुपये प्रति कपपर्यंतचा चहा मिळतो. त्यांच्या दुकानाचं नाव निर्जश असं आहे. त्यांचं हे दुकानं संपूर्ण कोलकातामध्ये प्रसिद्ध आहे. हे दुकान कुठ्या शॉपिंग मॉल किंवा मोठ्या शोरुममध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला आहे.

रिपोर्टनुसार, अनेक लोक असे आहेत, जे जेव्हा केव्हा कोलकातामध्ये येतात तेव्हा या दुकानातील चहा पिल्याशिवाय जात नाहीत. पार्थ यांच्या दुकानात 100 वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात. यात सिल्वर नीडल व्हाईट टी, लेवेंडर टी, हिबिस्कस टी, वाइन टी, तुलसी जिंजर टी, ब्लू टिश्यन टी, तीस्ता वॅली टी, मकईबारी टी, रूबियोस टी आणि ओक्टी टी यांचाही समावेश आहे. या दुकानात जो चहा 1000 प्रति कप या दरात मिळतो तो आहे सिल्‍वर नीडल व्हाईट टी. हा चहा जगातील सर्वात शुद्ध चहांमधील एक असल्याचं मानलं जातं. सोबतच या चहाच्या निर्मितीसाठीही सामान्य चहापेक्षा तीन पट अधिक कामगार आणि वेळही लागतो. याच कारणामुळं हा चहा इतका महाग आहे.

First published:
top videos

    Tags: Kolkata, Tea, West Bengal Election