जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 3 जिल्ह्यांमध्ये अलर्ट

राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 3 जिल्ह्यांमध्ये अलर्ट

राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 3 जिल्ह्यांमध्ये अलर्ट

मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 सप्टेंबर : मुंबई-ठाणे-पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. दरम्यान, शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणता पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शुक्रवारी आणि शनिवारीही जिल्ह्यात पावसानं जोर धरला होता. शनिवारी अनेक भागांत झालेल्या मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. हे वाचा- पुणे-नाशिक महामार्गावरील घाटात ट्रकचा भीषण अपघात, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी मनमाड शहरात शनिवारी रात्री जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे नद्या नाले दुथरीभरून वाहात होते. नदी काठच्या लोकांना हलविण्यात आले सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. शहरातील सखल भागात साचलं पाणी असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. जालन्यात शनिवारी पावसानं जोरदार बॅटिंग केली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचलं असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तिकडे वाशिकमध्ये शनिवारी सगळीकडे पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन आणि कापासाचा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल याची चिंता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात