मुंबई, 2 मार्च: मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडे पाणी पुरवठ्यासंदर्भात समस्या वाढताना दिसत आहेत. पाइपलाईन नादुरुस्त होणं, पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड होणं आदी कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील घाटकोपर आणि मुलुंडमधील नागरिकांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार घाटकोपर आणि मुलुंडमधील काही भागांत 2 मार्च आणि 3 मार्च रोजी पाणीपुरवठा बंद असेल. पाईपलाईनचं काम करायचं असल्याने या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. `नवभारत टाइम्स`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. घाटकोपर आणि मुलुंडमधील काही भागांत 2 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 3 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भांडूप (पश्चिम) येथील क्वारी रोड परिसरात 2 मार्चच्या मध्यरात्रीपासून 1200 मिमी व्यासाची आणि 900 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भांडूप आणि घाटकोपरमधील अनेक भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद असेल. ``पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा,`` असं आवाहन बीएमसीच्या प्रशासनाने नागरिकांना केलं आहे. 1-2 नव्हे तब्बल 652 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; मुंबई महापालिकेत 12वी पाससाठी मोठ्या भरतीची घोषणा या भागांमध्ये पाणीपुरवठा असेल बंद - गावदेवी मार्ग, सर्वोदय नगर, भट्टीपाडा, जंगल-मंगल मार्ग, भांडूप (पश्चिम), जनता बाजार, ईश्वर नगर, टँक मार्ग, राजदीपनगर, उषानगर, ग्राम मार्ग, नरदासनगर, शिवाजीनगर, टेंभीपाडा, कौरी मार्गाच्या आसपासचा भाग, कोंबडी गल्ली, फरीदनगर, महाराष्ट्रनगर, अमर कौर विद्यालय परिसर, काजू हिल, जैन मंदिर गल्ली, बुद्धनगर, एकता पोलीस स्टेशनच्या आसपासचा परिसर, उत्कर्षनगर, फुगेवाला कंपाउंड, कासार कंपाउंड, लाल बहादूर शास्त्री रस्ता परिसर, जुने हनुमाननगर, नवे हनुमाननगर, अशोक हिल, फुलेनगर, रमाबाई आंबेडकर नगर -1 आणि 2, साई विहार, साई हिल या परिसरातील पाणीपुरवठा बंद असेल. तसेच लाल बहादूर शास्त्री मार्गाजवळील मंगतराम पेट्रोल पंपापासून गुलाटी पेट्रोल पंप विक्रोळीपर्यंत, कांजूरमार्ग (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसर, डॉकयार्ड कॉलनी, सूर्यनगर, चंदननगर, सनसिटी, गांधीनगर आंबेवाडी, इस्लामपुरा मशिद, विक्रोळी स्टेशन (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्गालगतची औद्योगिक वसाहत, डिजीक्यूए कॉलनी, गोदरेज निवासी कॉलनी, संतोषी मातानगर, टागोरनगर क्रमांक 5 आणि विक्रोळीमधील (पूर्व) पाणीपुरवठा बंद असेल. मोठी बातमी! नवी मुंबईत लोकल ट्रेनचा अपघात; नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर रुळांवरून घसरली ट्रेन Video एस वॉर्ड (भांडूप) अंतर्गत, प्रतापनगर रस्त्यालगतचा परिसर, कांबळे कंपाउंड, जमीलनगर, कोकणनगर, समर्थनगर, मुथ्थु कंपाउंड, संत रोहिदासनगर, राजा कॉलनी, शिंदे मैदान, सोनापूर, शास्त्रीनगर, लेक मार्ग, सीईटी टायर मार्ग, सुभाषनगर आणि आंबेवाडीत पाणी पुरवठा होणार नाही.
एन वॉर्ड (घाटकोपर परिसर) मधील लाल बहादूर शास्त्री मार्ग विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी स्टेशन मार्ग, विक्रोळी पार्क साइट आणि लोअर डेपो, पाडा पंपिंग स्टेशन, लोअर डेपो पाडा, अप्पर डेपो पाडा, सागरनगर, नगरपालिका भवन परिसर, वीर सावरकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), वाधवा, कल्पतरु, दामोदर पार्क, साईनाथ नगर मार्ग, उद्यान गल्ली आणि संघानी इस्टेटमधला पाणीपुरवठा 2 मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते 3 मार्च मध्यरात्रीपर्यंत खंडित असेल.

)







