मुंबई, 28 फेब्रुवारी: नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेरुळ ते उरण जाणारी लोकल अचानक आज सकाळी रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ - उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नेरुळ-उरण मार्गावर असलेल्या खारकोपर स्थनाकाजवळ ही घटना घडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकलचे तब्बल तीन डब्बे अचानक घसरल्यामुळे बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना सकाळी 9 वाजताची असल्यामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे नेहमीच्या वाहतुकीवरयाचा परिणाम झाला आहे. काही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची शक्यता आहे. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.
नवी मुंबईत दुर्घटना; लोकल ट्रेन पटरीवरून घसरली#navimumbai #localtrain #mumbailocal #news18lokmat pic.twitter.com/7bV4z3GDGt
— News18Lokmat (@News18lokmat) February 28, 2023
‘रेल्वे दल मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झालं आहे. या रेल्वे अपघातामुळे आता बेलापूर-खारकोपर-नेरुळ मार्गावर कोणत्याही लोकल ट्रेन सुरू नाहीत अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.