• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • "भाऊ-भाऊ म्हणून एकत्र लढले पण निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपने जे केलं ते..." : विक्रम गोखले

"भाऊ-भाऊ म्हणून एकत्र लढले पण निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपने जे केलं ते..." : विक्रम गोखले

"भाऊ-भाऊ म्हणून एकत्र लढले पण निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपने जे केलं ते..."

"भाऊ-भाऊ म्हणून एकत्र लढले पण निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपने जे केलं ते..."

Vikram Gokhale on Shiv Sena BJP alliance: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

  • Share this:
मुंबई, 19 नोव्हेंबर : शिवसेना (Shiv Sena) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकत्र आले तर बरं होईल असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केलं होतं. त्यानंतर आज विक्रम गोखले यांनी पुन्हा शिवसेना-भाजप युतीवर भाष्ये केलं आहे. विक्रम गोखले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय यावेळी विक्रम गोखले म्हणाले, भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. यासोबतच युती तोडली त्यावर जनतेच्या मनात काय भावना आहेत यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. (Vikram Gokhale on Shiv Sena - BJP alliance) नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले? गेले 30-32 वर्ष असलेल्या पक्षांनी पण मला आमच्यात या अशी ऑफर दिली होती. तसेच तुम्हाला काय हवं ते देतो असं सांगितलं होतं पण मी गेलो नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. भाऊ-भाऊ... धाकटा भाऊ असं मागच्या निवडणुकीत म्हटलं गेलं आणि लोकांनी त्यांना मतदान दिलं. पण निवडणुकीनंतर शिवसेना भाजपने जे केलं, जनतेला ते आपला विश्वास घात झाल्यासारखं वाटलं. वाचा : 2014 पासून खरं स्वातंत्रय मिळालं हे आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही : विक्रम गोखले युतीवर काय म्हणाले होते विक्रम गोखले ? भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं. राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे... आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं. विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही : संजय राऊत अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं होतं. तसेच शिवसेना आणि भाजप युती तुटणं ही चूक असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणले होते, विक्रम गोखले कोण ? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटलं होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय.
Published by:Sunil Desale
First published: