मुंबई, 19 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला. याच विषयावर अभिनेते विक्रम गोखले (Vikram Golhale) यांनी तिचं समर्थन केल्याने त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला. यानंतर आज विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आणि आपलं मत मांडलं आहे. विक्रम गोखले यांनी म्हटलं, आज मी पत्रकार परिषदेत फक्त माझी बाजू मांडत आहे. मी कंगनाला ओळखत नाही आणि तिच्यासोबत मी कामही केलेलं नाहीये. भारतीय नागरिक आणि राजकीय अभ्यासक म्हणून 2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत आहे. हे माझं मत मी बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला नाही. 18 मे 2014 चा गार्डियन चा अंक वाचा. त्यात जे होतं ते कंगना बोललं. कंगना काही चुकीचं बोलली नाही इतकंच मी बोललो असंही विक्रम गोखले म्हणाले. गेले-30-32 वर्ष असलेल्या पक्षांनी पण मला आमच्यात या अशी ऑफर दिली, तुम्हाला काय हवं ते देतो पण मी गेलो नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे असंही विक्रम गोखलेंनी म्हटलं. वाचा : विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही : संजय राऊत कंगनाच्या विधानाचे केले होते समर्थन बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होतं. युतीवर काय म्हणाले होते विक्रम गोखले ? भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं. राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.