Home /News /mumbai /

Mansukh Hiren सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा VIDEO आला समोर

Mansukh Hiren सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा VIDEO आला समोर

विशेष म्हणजे, सचिन वाझे यांच्याकडून जी गाडी जप्त करण्यात आली होती ती हीच मर्सिडीज कार आहे

मुंबई, 25 मार्च :  मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death case) हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) करत आहे. या प्रकरणी एक नवीन सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये मनसुख हिरेन हे सचिन वाझेंच्या कारमध्ये बसत असल्याचे दिसत आहे. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वालचंद हिराचंद मार्ग परिसरातला हा CCTV आहे. एका सिग्नलवर सचिन वाझे हे मसिर्डीज कार घेऊन उभे आहे. त्याचवेळी मनसुख हिरेन त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर वाझेंच्या गाडीत मनसुख हिरेन बसले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, सचिन वाझे यांच्याकडून जी गाडी जप्त करण्यात आली होती ती हीच मर्सिडीज कार आहे. सीसीटीव्हीमध्ये मनसुख हिरेन याच गाडीत बसताना दिसत आहे. हा सीसीटीव्ही 17 तारखेचा असून गुन्हाची उकल होण्यास मदतीचा ठरणार आहे. 'त्या' रात्री काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर त्याबद्दल ज्या बातम्या येऊ लागल्या किंवा चर्चा होऊ लागली. त्यामुळे मनसुख अत्यंत अस्वस्थ झाला होता. एवढंच नाही तर मनसुखची पत्नी विमला मनसुख यांनी दिलेल्या जबाबानुसार, ज्यावेळेस स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण समोर आलं. त्यानंतर सचिन वाझे यांनीच 'या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन स्वतःला अटक करून घे मी तुला बाहेर काढतो सर्व प्रकरण माझ्याकडेच आहे', असं मनसुख ला सांगितलं होतं. मे महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary! वाचा काय असणार पगाराचं गणित पण या भानगडीत पडण्यास मनसुख यांनी नकार दिल्याने सचिन वाझे आणि त्याच्या टीमचा मनसुख हिरेन यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला होता तसंच मनसुख हा आपल्याला अडचणीत आणू शकतो, यामुळे मनसुखची हत्या करण्यात आली आहे, असं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं. मनसुख हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झाला असून याबाबतची सविस्तर माहिती न्यूज 18 लोकमत च्या हाती लागली आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मार्चच्या रात्री साधारणपणे 8 च्या सुमारास अटक आरोपी विनायक शिंदे यानेच मनसुख याला फोन करून आपण कांदिवली क्राइम ब्रांच मधून बोलत आहोत, आपले नाव तावडे असून हिरव्या रंगाच्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी संदर्भात आपली चौकशी करायची आहे. याकरता तुम्ही मला भेटायला या असा विनायक शिंदे यांनी सांगितल्यानंतर मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला घराखाली उतरताच पुन्हा त्या तावडे नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि 'घोडबंदर इथे आपण भेटूया. मी घोडबंदर दिशेने निघालो आहे तुम्हाला फोन करतो' असं विनायक शिंदे येणे मनसुख सांगितलं होतं. हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा त्यानुसार, मनसुख घोडबंदर येथे गेला असता विनायक शिंदे हा माणूस मनसुखला भेटला, तिथून या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली त्यानंतर मनसुख हा तावडे म्हणजेच विनायक शिंदे सोबत गाडीत बसून निघून गेला. तो कुठे गेला याबाबत अजून तपास यंत्रणांना माहिती मिळाली नसून तपास यंत्रणा या ठिकाणांचा शोध घेत आहे. मात्र याच दरम्यान मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आलं असं सांगितलं जातं आहे. मनसुख याने त्यावेळेस घातलेले मास्क काढून त्याला दुसरा मास्क घालायला दिला गेला. त्याच मास्कमध्ये बेशुद्ध करण्याचे औषध टाकण्यात आले होते. मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला दिलेल्या माहितीनुसार, मनसुख 4 मार्च रात्री जेव्हा घरातून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांच्या चेहर्‍यावर असलेला मास्क आणि त्यांचा मृतदेह सापडला, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर असलेला मास्क हे दोन्ही मास्क वेगवेगळे आहेत. त्यामुळे नवीन मास्कमध्ये बेशुद्ध करण्याचे औषध टाकून मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आले असावे, असा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला संशय होता. चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ मनसुख बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या मास्कच्या आत पाच ते सहा रुमाल ठेवण्यात आले आणि त्याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत फेकण्यात आला. त्यावेळेस शेवटपर्यंत विनायक शिंदे हा घटनास्थळी उपस्थित होता. एवढंच नाहीतर मास्क च्या आत पाच ते सहा रुमाल ठेवण्या मागचे कारण म्हणजे मनसुख यांच्या तोंडातून पाणी शरीरात हळूहळू जाईल. परिणामी भरती आल्यावर मनसुख यांचा मृतदेह पाण्याच्या खाली खोलवर राहून दूरपर्यंत वाहत जाईल, असा अंदाज हत्या करणार्‍यांचा होता. मात्र, असं न घडता मनसुख यांचा मृतदेह तिथं गाळातच रुतून राहिला. परिणामी ओहोटी लागल्यावर मनसुख यांचा मृतदेहवर आल्याने दिसू लागला आणि मनसुख यांच्या मृतदेह समोर आला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Cctv footage, Hiren mansukh, Mumbai, Nia, Sachin vaze

पुढील बातम्या