जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ

चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ

चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ

अभिनेत्रींना किस करणं हे देखील तिला आवडत नाही. (kissing scene) एकदा तर तिनं किसिंग सीन पाहून रागाच्या भरात इमरानला रक्तबंबाळ केलं होतं. पाहा काय होता तो किस्सा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 मार्च**:** इमरान हाशमी (Emraan Hashmi) हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता आहे. त्यानं रोमँटिक पासून अॅक्शन हिरोपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु असं असताना देखील इमरानला द सीरिअल किसर (The serial kisser) असं म्हटलं जातं. प्रामुख्यानं त्याची किसिंग सीनसाठीच स्तुती केली जाते. मात्र अशा प्रकारची प्रशंसा इमरानच्या पत्नीला बिलकूल आवडत नाही. किंबहूना त्यानं इतर अभिनेत्रींना किस करणं हे देखील तिला आवडत नाही. (kissing scene) एकदा तimraर तिनं किसिंग सीन पाहून रागाच्या भरात इमरानला रक्तबंबाळ केलं होतं. पाहा काय होता तो किस्सा…

null

अवश्य पाहा - बेरोजगार अभिनेत्याचा दुदैवी अंत; रिक्षात सापडला मृतदेह इमरानच्या पत्नीचं नाव परवीन सहानी असं आहे. तो एकदा बायकोला खुश करण्यासाठी आपला चित्रपट दाखवायला घेऊन गेला होता. मात्र या चित्रपटात इमरानचा एक किसिंग सीन आला. हा सीन पाहून थिएटरमधील प्रेक्षक जोरजोरानं त्याची स्तुती करत होते. अर्थात त्यांचा ही स्तुती परवीनला मात्र आवडली नाही. तिनं इमरानच्या हातावर नखं मारुन आपला राग व्यक्त केला. तिनं रागाच्या भरात इतक्या जोरदारपणे जख मारली की त्याच्या हातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर परवीन थिएटरमधून निघून गेली. हा किस्सा इमराननं कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितला होता. तेव्हापासून इमरानं चित्रपटात किसिंग सीन करणं कमी केलं. शिवाय स्वत:चे चित्रपट तो आपल्या बायकोला दाखवत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात