मराठी बातम्या /बातम्या /मनी /May महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary! नवीन लेबर कोडमुळे काय असणार पगाराचं गणित?

May महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary! नवीन लेबर कोडमुळे काय असणार पगाराचं गणित?

Salary

Salary

New Wage Code: नवीन लेबर कोडमध्ये तुमची कॉस्ट टू कंपनी (CTC) नव्याने ठरवली जाईल. याचा परिणाम असा होईल की तुमची पीएफमधील योगदान (PF Contribution) वाढेल.

नवी दिल्ली, 24 मार्च: देशात पुढील महिन्यापासून अर्थात 1 एप्रिल 2021 पासून चार नवीन लेबर कोड्स (New Labour Codes) लागू होणार आहेत. हे लागू झाल्यानंतर देशात पगाराबाबत (Salary) काही नवीन नियम लागू होती. मोदी सरकारच्या (Modi Government) न्यू वेज कोडनुसार (New Wage Code) मे 2021 पासून तुम्हाला मिळणाऱ्या एकूण पगारात बेसिक सॅलरीचा हिस्सा कमीत कमी 50 टक्के करणे अनिवार्य असेल. एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात अधिकतर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देतात.

नवीन लेबर कोडमध्ये तुमची कॉस्ट टू कंपनी (CTC) नव्याने ठरवली जाईल. याचा परिणाम असा होईल की तुमची पीएफमधील योगदान (PF Contribution) वाढेल. म्हणजेच तुमचे इनक्रिमेंट झाले तरी ते पीएफमध्ये जाऊ शकते, त्यामुळे पगारवाढ होऊनही तुमची टेक होम सॅलरी (Take Home Salary) कमी होण्याची शक्यता आहे.

नवीन कायद्यांचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

टेक होम सॅलरी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, या कोडनुसार कंपन्यांना सीटीसी किंवा एकूण पगारात मूलभूत पगारचा हिस्सा कमीतकमी 50 टक्के करावा लागेल. असे केल्याने तुमची टेक होम सॅलरी कमी होईल.  पण ग्रॅच्युइटीचे प्रमाण तसंच कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या पीएफ योगदानाची टक्केवारी वाढेल. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की उच्च व मध्यम वेतन गटांवर फारसा परिणाम होणार नाही, परंतु ज्यांचा पगार कमी आहे, त्यांच्या घरच्या पगारावर 25 ते 30 टक्के परिणाम होऊ शकतो.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचे दर 800 रुपयांनी घसरले, काय आहे मुंबई-पुण्यातील भाव)

जाणकारांच्या मते नवीन लेबर कोडमध्ये पगाराची नवीन परिभाषा प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे कंपन्यांना ग्रॅच्युइटी, रजांच्या बदल्यात पैसे आणि पीएफसाठी जास्त रक्कम देण्याची तरतूद करण्याची आवश्यकता असेल. नवीन तरतुदींनुसार, केवळ त्याच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन केल्यानंतर, कंपन्या दुसऱ्या सहामाहीत पगार बजेटचा आढावा घेतील.

First published:

Tags: Modi government, Money, Pf, Salary