मुंबई, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (aryan Khan arrest case) घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. 'प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल' असं महत्त्वाचं विधान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी केलं आहे. तसंच, या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिकांचा बार लावला आहे. त्यातच पंच प्रभाकर साईलने खंडणीचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली.
'प्रभाकर साईल याने संरक्षण मागितले होते त्यांना पोलीसांना संरक्षण दिले आहे. त्याने जे काही आरोप केले आहे ते गंभीर आहे जर प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, असं स्पष्टपणे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी
नवाब मलिकांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी जुजबी चर्चा झाली, या विषयावर चर्चा झाली नाही, दुसर्या विषयाबाबत बैठक होती, असंही वळसे पाटलांनी सांगितलं.
तसंच, केंद्रीय तपास संस्थांचा वापर इतका एवढ्या वर्षात झाला नव्हता, सरकारला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, त्याबाबत मी माझी भूमिका मांडली आहे, असंही वळसे पाटील म्हणाले.
कोर्टाने समीर वानखेडेंची याचिका फेटाळली
दरम्यान, पंच प्रभाकर साईल याने काल एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पंच किरण गोसावीवर 25 कोटी खंडणीचा आरोप केला होता. या 25 कोटीची डील ही 18 कोटींवर फायनल झाली होती. यातील 8 कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा साईलने केला आहे.
प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध करून जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज प्रभाकर साईल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही दावा केला आहे, तो ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्यावर वैयक्तिगत आणि कुटुंबावर नको ते आरोप होत आहे, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला होता.
व्यवसायाचं ‘गणित’!हे गुरुजी पॉर्न वेबसाईटवर शिकवतात MATHS, कमावतात कोट्यवधी
परंतु, एनसीबीची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. एनसीबीनं योग्य कोर्टात दाद मागावी, असं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. समीर वानखेडे आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का हे पाहावे लागणार आहे.
किरण गोसावी लखनौमध्ये !
तर दुसरीकडे, दोनच दिवसांपूर्वी पंच प्रभाकर साईल याने किरण गोसावीवर आर्यन खान अटक प्रकरणात 25 कोटींची लाच मागितली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली. अखेर या प्रकरणी किरण गोसावी याने CNN news 18 शी संवाद साधून सर्व आरोप फेटाळून लावले. किरण गोसावी हा सध्या उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये मुक्कामी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.