• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • व्यवसायाचं ‘गणित’!हे गुरुजी पॉर्न वेबसाईटवर शिकवतात MATHS, कमावतात कोट्यवधी रुपये

व्यवसायाचं ‘गणित’!हे गुरुजी पॉर्न वेबसाईटवर शिकवतात MATHS, कमावतात कोट्यवधी रुपये

पॉर्न वेबसाईटवर गणिताचे धडे (Teacher teaches mathematics on porn website earn crores) देऊन कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या एका गुरुजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

 • Share this:
  तैवान, 25 ऑक्टोबर : पॉर्न वेबसाईटवर गणिताचे धडे (Teacher teaches mathematics on porn website earn crores) देऊन कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या एका गुरुजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या शिक्षकांनी अगोदर यूट्यूबवरून गणित (Taught mathematics on YouTube) शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मिळणारा (Limited response) प्रतिसाद हा जेमतेमच होता. त्यानंतर मात्र त्यांनी प्रयोग म्हणून एका पॉर्न वेबसाईटवर गणित शिकवायला सुरुवात केली आणि चमत्कारच झाला. असा लागला शोध तैवानमध्ये राहणारे चांगसू नावाचे हे शिक्षक गणिताचे एक चांगले अध्यापक म्हणून ओळखले जातात. गणित विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली असून गेल्या दशकभरापासून ते विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून गणित शिकवत आहेत. यापूर्वी त्यांनी यूट्यूबवरूनही गणिताचे धडे देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आपला प्लॅटफॉर्म बदलण्याच्या विचारात ते होते. त्याच काळात एका पॉर्न वेबसाईटची माहिती त्यांना समजली. पॉर्न वेबसाईटवरून गणिताचे धडे या वेबसाईटवर पॉर्न पाहायला येणारे प्रेक्षक गणितही शिकतील, असा अंदाज बांधून तिथे त्यांनी आपले व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. पॉर्न पाहणाऱ्या अनेकांनी चांगसू यांना सबस्क्राईब केलं आणि मोठा विद्यार्थी वर्ग त्यांना मिळाला. हे विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम विकत घेत असून दरवर्षी त्यांना 7,500,000 तैवानी डॉलर्सची कमाई होते. भारतीय चलनात ही रक्कम आहे 1 कोटी 88 लाख रुपये. म्हणजेच दरमहा ते 15 लाख रुपये कमावतात. हे वाचा- Boyfriend च्या या विचित्र सवयीने तरुणी बेजार, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल इच्छा नव्हती पण प्रतिसाद मिळाला शिक्षणासारखं पवित्र काम पॉर्न वेबसाईटवरून करायला आपलं मन तयार होत नव्हतं, अशी प्रतिक्रिया चांगसू यांनी दिली आहे. मात्र जर विद्यार्थ्यांपर्यंत कुठल्याही माध्यमातून शिक्षण पोहोचत असेल, तर आपण ते द्यायला काहीच हरकत नाही, असं ते सांगतात. मात्र पॉर्न बेवसाईटवरून शैक्षणिक साहित्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत.
  Published by:desk news
  First published: