लखनऊ, 15 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) 5 जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील (UP) भाजप खासदार बृजभूषण सिंह BJP MP Brij Bhushan Singh) यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागीतली तरंच त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आज राज ठाकरे यांच्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. "राज ठाकरे वरुन आले तर हनुमानजी त्यांना वरतून उचलून घेतील", असं विधान बृजभूषण सिंह यांनी केलं आहे. 'टीव्ही 9 मराठी' वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रदर्शित केली आहे.
"एक निवेदन केलं की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटू नये. तसेच जोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांसोबत केल्या गेल्या गैरवर्तवणुकीबाबत खेद व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही", असं बृजभूषण सिंह म्हणाले. बृजभूषण सिंह यांनी केलेल्या या विधानावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला केलेल्या या विरोधामुळे त्यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात तर अडकणार नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
(काँग्रेसमध्ये आता एका कुटुंबाला एकच तिकीट, महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबांचे काय होणार?)
दरम्यान, राज ठाकरे यांना आता मुंबईतील उत्तर भारतीयांकडून अयोध्या दौऱ्यासाठी विरोध केला जात असल्याची बातमी समोर येक आहे. राज ठाकरेंनी जरूर आयोध्येला जावे पण त्याआधी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे राजकीय स्टंट करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपचा महापौर होणार हाच संकल्प, भाजप नेत्यांनी सुद्धा आयोध्येला जावे प्रभु रामाचे दर्शन घ्यावे, असं मुंबईतील उत्तर भारतीय म्हणाले आहेत.
बृजभूषण सिंह यांचे काय म्हणणे आहे -
राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली. महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि त्यानंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे, या शब्दात खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर अयोध्येतील जनता, साधू संत राज ठाकरेंवर नाराज आहे, असेही ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, MNS, Raj Thackeray