रामदास आठवलेंनी केला अजब दावा, COVID-19 व्हॅक्सिनबाबतही दिले संकेत

रामदास आठवलेंनी केला अजब दावा, COVID-19 व्हॅक्सिनबाबतही दिले संकेत

मी 20 फेब्रुवारीला 'गो कोरोना गो'ची नारा दिला होता आणि देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात 'गो कोरोना गो' (Corona Go Go Corona) असा नारा देऊन सोशल मीडियात अक्षरश: धुमाकूळ घालणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.

कोरोना व्हॅक्सिनची (Corona Vaccine) सगळ्यांना प्रतिक्षा असताना रामदास आठवले यांनी दावा केला आहे की, COVID-19 व्हॅक्सिन पुढील एक-दो महिन्यात देशात उपलब्ध होईल.

हेही वाचा...बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज

रामदास आठवले म्हणाले, 'मी 20 फेब्रुवारीला 'गो कोरोना गो'ची नारा दिला होता आणि देशभरातील कोरोनाचा प्रसार कमी झाला. कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. कोरोना पुढील 6-7 महिने राहिल. नंतर मात्र त्याला हद्दपार व्हावंच लागेल.'

दरम्यान, रामदास आठवले हे आपल्या हटके वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहतात. देशभरात कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्यानंतर 'गो कोरोना गो' असा मंत्र देऊन रामदास आठवले ते चर्चेत आले होते. सोशल मीडियावर 'गो कोरोना गो' हा त्यांचा नारा प्रचंड व्हायरल झाला होता.

हेही वाचा...सुरेश रैनावर गुन्हा दाखल, पोलिसांनी टाकला होता पबवर छापा

'गो कोरोना गो'चा नारा देणाऱ्या आठवलेंनाच कोरोना

रामदास आठवले यांनी गो कोरोना गो असा नारा दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती देखीव ठणठणीत होती. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आठवले होम क्वारंटाईन झाले होते.  डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. नंतर ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 22, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या