Home /News /mumbai /

BREAKING : सुरेश रैनावर गुन्हा दाखल, पोलिसांनी टाकला होता पबवर छापा

BREAKING : सुरेश रैनावर गुन्हा दाखल, पोलिसांनी टाकला होता पबवर छापा

15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैना आपल्या मुलीच्या नावावर सुरू केलेल्या ग्रेसिया रैना फाउंडेशन (GRF) या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करता. या संस्थेच्या मदतीनं रैना आपल्या वाढदिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला 34 शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार आहे. (Suresh Raina/Instagram)

15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैना आपल्या मुलीच्या नावावर सुरू केलेल्या ग्रेसिया रैना फाउंडेशन (GRF) या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करता. या संस्थेच्या मदतीनं रैना आपल्या वाढदिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला 34 शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार आहे. (Suresh Raina/Instagram)

मुंबईतील ड्रॅगन फ्लाय नावाच्या क्लबमध्ये पार्टी सुरू होती. या पार्टीत सुरैश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुशान रोशन खान हे तिघेही हजर होते.

    मुंबई, 22 डिसेंबर : कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी क्रिकेटर सुरेश रैना (suresh raina) याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टी सुरू होती.  नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैना याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत सोमवारी पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी ड्रॅगन फ्लाय या प्रतिष्ठित पबवर मुंबई पोलिसांनी रेड केली. सध्या कोरोना काळ असल्याने मुंबईत कलम 188 लागू आहे. त्यामुळे रात्री 11 नंतर हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरंटना सुरु ठेवण्याची परवानगी नाही. असं असतानाही मुंबईतील अंधेरी भागात ड्रॅगन फ्लाय नावाच्या एका पबमध्ये लेट नाईट पार्टी सुरू होती अशी माहिती मुंबई पोलिसांना कळताच त्यांनी पबवर छापा टाकला. या कारवाईत एकूण 34 लोकांना अटक केली. ज्यात क्रिकेटर सुरेश रैना आणि अभिनेत्री सुझेन रोशनसह अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहे. बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज गावदेवी पोलिसांच्या पथकाने या क्लबवर पहाटे 2.30  वाजेच्या सुमारास छापा टाकला असता मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईत 34 जणांना ताब्यात घेतले आहे. यात क्लबच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 'लागिरं झालं जी...' साताऱ्याच्या 'अज्या'ने आणली काश्मिरी सून! मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार फक्त क्रिकेटर सुरेश रैना आणि अभिनेत्री सुझेन रोशनवर गुन्हा दाखल केला आहे. तर ज्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यात काही मुंबईतील, काही पंजाब आणि काही दिल्ली येथून आले होते. सुरैश रैनाने याच वर्षी 15 ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. महेंद्रसिंग धोनीने एकदिवशी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत रैनाने 'आपण तुझ्यासोबत आहोत' असं सांगत निवृत्तीची घोषणा केली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai police, Suresh raina

    पुढील बातम्या