मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगच्या हस्तकाला नालासोपाऱ्यात अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगच्या हस्तकाला नालासोपाऱ्यात अटक

 गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अख्तर कासमअली मर्चेटला  अटक करण्यात दहशतवाद विरोधी कक्षाला यश आलं आहे.

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अख्तर कासमअली मर्चेटला अटक करण्यात दहशतवाद विरोधी कक्षाला यश आलं आहे.

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अख्तर कासमअली मर्चेटला अटक करण्यात दहशतवाद विरोधी कक्षाला यश आलं आहे.

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, 26 फेब्रुवारी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असलेल्या आणि मुंबई, गुजरात, ठाणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अख्तर कासमअली मर्चेटला  अटक करण्यात दहशतवाद विरोधी कक्षाला यश आलं आहे. मर्चेटला  बेड्या ठोकल्या असून त्याला नयानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

फरार आरोपी अख्तर कासमअली मर्चेट (५६) याला नालासोपारा येथून ताब्यात घेतलं आहे.  त्याच्यावर मुंबई, महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो दाऊद इब्राहीम टोळीशी संबंधीत असून मुंबईतील सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःची टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून तो खंडणी गोळा करणे, अपहरण करणे, पैसे उकळणे असे गुन्हे दाखल आहे.   ठाणे ग्रामीण, मिरारोड, नागपाडा, मुंबई, वसई विरार नालासोपारा भागांमध्ये दहशत असलेला अख्तर  मर्चेट  ठाणे ग्रामीण जिल्हा नयानगर पोलीस ठाण्यात २०१८ पासून नजरेआड होता.

नालासोपारा येथील राहणारा असल्यानं आणि त्याचे हालचालीवर लक्ष ठेवण्या बाबत पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी दहशतवाद विरोधी कक्षला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी कक्ष टीम त्याचा मागोवा घेत होतं. दरम्यान, डिसेंबर २०१८ पासून तो नेपाळ,बांग्लादेश इथं लपून राहिला होता. बांग्लादेश इथून पासपोर्ट बनवून तो नैरोबी इथं जाण्याचे प्रयत्नात अयशस्वी झाल्याने मुंबई परत आला होता.

मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी नालासोपारा इथं येणार असल्याची खात्रीशीर खबर दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाल्याने दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम,चंद्रकांत ढाणे,एस.एच.निकोळे, पी.एस.तुरकर, एम.व्हि.चव्हाण , जे.ए.गोवारी, एस.व्ही.पाटील, ए.एस.चव्हाण,डी.एम.गायकवाड,टी.के.माळी, ए.व्ही. तळपाडे, पी.बी. वाघ यांनी नालासोपारा पश्चिमेकडील सिविक सेंटर चौक इथं सापळा रचून मोठ्या शिताफीने मर्चटला ताब्यात घेतले. विचारपूस करुन मिरारोड येथील नयानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

First published:

Tags: Arrested, Dawood ibrahim, Gangster, Nalasopara, Underworld don