मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं..' भाजप नेत्याचा थेट हल्ला म्हणाले, आधी MIM अन् आता..

'प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं..' भाजप नेत्याचा थेट हल्ला म्हणाले, आधी MIM अन् आता..

आमदार राम शिंदे यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

आमदार राम शिंदे यांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

भाजप प्रवक्ते आमदार राम शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यीवर टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदनगर, 25 फेब्रुवारी : "वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांची फसगत झालेली आहे" अशी टीका भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी केली आहे. मुस्लिम लोकांनी साथ दिली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. याबाबत भाजप प्रवक्ते राम शिंदे यांना विचारले असता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने एमआयएम बरोबर युती केली होती, त्यांनी त्यांच्याबरोबर फारकत घेतली. आता त्यांनी नव्याने प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दरम्यान वंचितने चिंचवडमध्ये उमेदवार दिला होता. त्यांनी बोर्डावर बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावले. पण, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलं. त्यामुळे त्यांची फसगत झालेली आहे, असं राम शिंदे म्हणाले.

मोदींच्या नेतृत्वामुळे भयभीत नेते एकत्र येतायेत : राम शिंदे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली यावर बोलताना, मोदींच्या नेतृत्वामुळे भयभीत झालेले, अडचणीत आलेले सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 ला देखील तसा प्रयत्न झाला. आता भविष्यात देखील तशा पद्धतीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण याचा भाजपला काहीही फरक पडणार नाही. हा त्यांचा केवळ मीडियाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, असं राम शिंदे म्हणाले.

वाचा - ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर कोर्टाचं 'ते' विधान चुकीचं, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

भाजप निवडणुकीला घाबरत आहे म्हणून ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. त्यावर बोलताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी निवडणुकीला घाबरत नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान हे देशाला लाभले आहे. त्यांच्यामुळे देशाचं जगात नाव गाजत आहे. जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात. आता जेव्हा केव्हा मैदान सुरू होईल त्यावेळेस कोण निवडणुकीला घाबरतात हे आपल्याला भविष्यात दिसेल असं राम शिंदे म्हणाले.

कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटले जात असल्याच्या आरोपावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, प्रचार संपलेला आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने स्टंटबाजी केली जात आहे. बिन बुडाचे आरोप केले जात आहेत. लोकांचं मन, मत विचलित करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या उमेदवाराकडून केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Prakash ambedkar