शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले...

शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले...

या सरकारच्या भवितव्याबद्दल मला कुठलीही शंका वाटत नाही. कारण सरकारचं जो नेतृत्व करतो त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं.

  • Share this:

मुंबई 22 फेब्रुवारी : महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं त्यामुळे हे सरकार टिकणार का? असा प्रश्न कायम विचारला जातो. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं भाष्य करत त्यांचं तोंडभरून कौतुक केलंय. ते म्हणाले, या सरकारच्या भवितव्याबद्दल मला कुठलीही शंका वाटत नाही. कारण सरकारचं जो नेतृत्व करतो त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव हा शांत आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार असंही त्यांनी सांगितलं.

पवार म्हणाले, उद्धव ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. एखादं काम सोपविल्यानंतर त्यात हस्तक्षेप करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे हे सरकार टिकेल. भाजप आता प्रभावी विरोधी पक्षाच्या भूमिकेत येतोय असं वाटतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काम हळूहळू थांबवतोय

पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय. कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहात असतो.

महाराष्ट्रात राबविणार शिक्षणाचा 'केजरीवाल पॅटर्न', असा आहे प्लान

त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नसतं. त्यामुळे तुमचा मान राहात नाही. असंही त्यांनी स्पष्टपणे सांगत नव्या भूमिकेचे संकेत दिले. 'एबीपी-माझा'च्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

'देवेंद्र फडणवीस जास्त काळ विरोधी पक्षनेते म्हणून राहणार नाहीत' तर...

वयाच्या 80व्या वर्षीही पवार हे अजुनही अतिशय सक्रिय आहेत. सातारा पोटनिवडणुकीत त्यांनी पावसात दिलेलं भाषण प्रचंड गाजलं होतं. याही वयात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेत असल्याने त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून चर्चा केली जात असते. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या त्यांच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातल्या राजकीय प्रयोगाचं सर्व श्रेय हे त्यांनाच दिलं जातं.

First published: February 22, 2020, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading