नागपूर 22 फेब्रुवारी : मी पुन्हा येणार….मी पुन्हा येणार असं सांगत प्रचारात राळ उठवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नंतर मात्र मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. महाराष्ट्रात सत्तेचं नाट्य महिनाभर चाललं आणि त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस हे सातत्याने भाजपचेच सरकार पुन्हा येणार असल्याचं सांगत आहेत. आता तर खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच त्याबाबतचे संकेत दिले आहेत. राजकारण आणि लोकशाहीत सरकारचं येणं जाणं सुरुच राहतं. त्यात काही विशेष नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलंय. नागपूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. भैय्याजी जोशी म्हणाले, आपल्या देशातली लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आहे. सरकार तयार करणं हे लोकांच्या हातात आहे. लोक आपलं काम करतात. विरोधी पक्ष नेते म्हणून आणि माजी मुख्यमंत्री म्हणून राहणं हे देवेंद्र फडणवीसांच्या भाग्यात फार काळ राहणार नाही. ते अल्पवधीसाठीच माजी मुख्यमंत्री राहतील असंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक! ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या संघाचे सरकार्यवाह असलेले भय्याजी जोशी यांनी असं मत व्यक्त करणं याला विशेष महत्त्व आहे. त्यांनी फडणवीसांच्याच मताला अधोरेखीत केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजप यापुढच्या काळात महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन लोटस’ सुरू करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. हेही वाचा… मातीचा ढिगारा खचल्याने 4 महिला कामगारांचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







