महाराष्ट्रात राबविणार शिक्षणाचा 'केजरीवाल पॅटर्न', असा आहे प्लान

महाराष्ट्रात राबविणार शिक्षणाचा 'केजरीवाल पॅटर्न', असा आहे प्लान

'आपण कायम विदेशात जाऊन तिथली विद्यापीठं पाहतो आणि त्यांच्याशी करार करतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण दिल्लीत जे काही चांगले प्रयोग झाले त्यापासून शिकत महाराष्ट्रातही काही बदल घडवायचे आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली 22 फेब्रुवारी :  दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राबवलेला शिक्षणाचा पॅटर्न आता महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या पॅटर्नची देशभर चर्चा झाली होती. राज्याचे  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली. दिल्लीच्या सरकारी शाळांचा कायापालट करण्यात केजरीवाल सरकारला मोठं यश मिळालं होतं. जुन्या पडक्या शाळा पाडून तिथं दिल्ली सरकारने आधुनिक आणि पायाभूत सुविधांनी युक्त असलेल्या शाळा उभारल्या आहेत. त्याचा मोठा फायदा गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. या उपक्रमाची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. तोच पॅटर्न आता राज्यातही लागू केला जाणार असल्याचे संकेत सामंत यांनी दिलेत.

मनिष सिसोदिया यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सामंत म्हणाले, आपण कायम विदेशात जाऊन तिथली विद्यापीठं पाहतो आणि त्यांच्याशी करार करतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण दिल्लीत जे काही चांगले प्रयोग झाले त्यापासून शिकत महाराष्ट्रातही काही बदल घडवायचे आहेत. त्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकार एकत्र काम करणार आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत याच लोकोपयोगी कामांमुळे अरविंद केजरीवाल यांच्या आपला घवघवीत यश मिळालं होतं.

अन्य एका कार्यक्रमात बोलताना उदय सामंत म्हणाले, 15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रिडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील.

मातीचा ढिगारा खचल्याने 4 महिला कामगारांचा मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात सामंत बोलत होते.

सावंत पुढे म्हणाले, भविष्यात दहशतवाद्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या वाईट घटनांना परिणाम देण्यात येणार आहे त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रिडा विद्यापीठ सुरू केले जाईल असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.   विद्यार्थी दशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये  राष्ट्रगीत गाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

धक्कादायक! ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांची गोळी झाडून हत्या

राज्यात 20 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगीत गातात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालंय अल्कोहोलविरहित व रॅगिंग रहीत करण्यासाठी सरकारने पाऊले उचलेली आहेत. देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही सामंत म्हणाले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2020 10:00 AM IST

ताज्या बातम्या