मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /"कोविड काळातील कामाचं न्यूयॉर्कपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांनी कौतुक केलं", उद्धव ठाकरेंचं टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

"कोविड काळातील कामाचं न्यूयॉर्कपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांनी कौतुक केलं", उद्धव ठाकरेंचं टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बीएमसीच्या WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बीएमसीच्या WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बीएमसीच्या WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

मुंबई, 14 जानेवारी : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने शिवसेना, महाविकास आघाडी आणि मुंबई मनपावर (BMC) टीका करण्यात येत असते. याच मुद्द्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बीएमसीच्या WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण (CM Uddhav Thackeray launched BMC's WhatsApp Chatbot service) करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. काम न करताना बोलणारे अनेक जण आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. आपलं लोक कौतुक करत नसले तरी कोविडच्या संकटात केलेल्या कामाचं न्यूयॉर्कपासून न्यायालयापर्यंत अनेकांनी केलं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लपवाछपवी कशाला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकदा असं होतं की, कामं न करताही बोलणारे अनेकजण आहेत. काहीजण असे आहेत की कामं करतात पण बोलत नाहीत. मग त्याला म्हणतात जंगल मैं मोर नाचा किसने देखा. तर आपण संपूर्ण जगाला दाखवतोय की आम्ही काय करतो. आमचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे. यात लपवण्यासारखं काहीही नाहीये. तुमच्या सेवेसाठी करताना त्यात लपवाछपवी कशाला पाहिजे. जे आहे ते सर्व खुलं आहे.

वाचा : BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण, एका Hi वर होणार तक्रारीचं निवारण

प्रश्न विचारायाला फारकाही अकलेची गरज नसते

कौतुक कुणी करावं म्हणून आपण ही कामं करत नसलो तरी देखील एक कर्तव्य म्हणून आपल्याला ही कामे करावे लागतात. उद्या कौतुक किती होईल त्याची मला अपेक्षा नाहीये पण जरा कुठे काही कमी झालं तर महापालिकेच्या नावाने खापर फोडायला मात्र, सर्व मोकळे असतात. जरा काही झालं तर नगरसेवक काय करतायत? महापौर काय करतायत? आयुक्त काय करतायत? हे सर्व ठिक आहे.. पण तू काय करतोयस हे सांग. स्वत: काही करायचं नाही आणि महापालिका काय करते. प्रश्न विचारायला खूप सोपं असतं आणि प्रश्न विचारायाला फारकाही अकलेची गरज नसते असं मला वाटतं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

वाचा : मुंबईतल्या ऑक्सिजन बेड्सबाबत अपडेट, BMC आयुक्त इक्बाल चहल म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब आहे. मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या.

First published:

Tags: BJP, Mumbai, Shiv sena, Uddhav thackeray