Home /News /mumbai /

BMC WhatsApp Chatbot: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण, एका Hi वर होणार तक्रारीचं निवारण

BMC WhatsApp Chatbot: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण, एका Hi वर होणार तक्रारीचं निवारण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण, एका Hi वर मिळणार 80 सेवा-सुविधा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते BMC WhatsApp चॅट बॉट सेवेचं लोकार्पण, एका Hi वर मिळणार 80 सेवा-सुविधा

BMC WhatsApp Chat Bot service available now: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना सेवा-सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

मुंबई, 4 जानेवारी : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी (Important news for Mumbaikar) आहे. मुंबईकरांसाठी बीएमसीने (BMC) आता आणखी एक हायटेक सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्याच्या माध्यमातून नागिरकांना 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत. (BMC's WhatsApp Chatbot launched) यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब आहे. मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली. तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा. सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खूप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा : मुंबईतल्या ऑक्सिजन बेड्सबाबत अपडेट, BMC आयुक्त इक्बाल चहल म्हणतात... बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज शुक्रवार 14 जानेवारी 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी माननीय वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, माननीय पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या माननीय महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) श्री. शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते. कोविड 19 विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, सदर कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे • मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा. • गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील. • आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस. • शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम • माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब. • मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात. • आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या • वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली • तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा • सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा. • तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही. • मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे • वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. 500 चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना 80 सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे. • जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही • नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे • महापालिका आयुक्तांना सुचना, महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. • महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी. • ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण. • कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद • कौतूकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून करतो. • स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. • माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो. मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे • आज अत्यंत आनंदाचा दिवस. मकर संक्रांतीत अपेक्षित असलेले संक्रमण आपण आज माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अत्यंत चांगल्या दिशेन करत आहोत ही आनंदाची बाब. • इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास देतो. • महाराष्ट्रासाठी, समाजासाठी खुप काही चांगलं करण्याचा प्रयत्न आज होत आहे. • इन्स्टा, फेसबूक चा महाराष्ट्र पर्यटनासाठी करणार • कोविड चॅटबॉट आपण महापालिकेत सुरु केल. जगात अशी एक दोनच राज्ये, त्यात आपलाही समावेश • वर्क फ्रॉम होम कल्चर सक्षम करण्याचा प्रयत्न • पाणी पट्टी, घरपट्टी, वीज बिल भरणे असेल, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असेल अशा अनेक 80 हून अधिक सुविधा नागरिकांना या व्हॉटसअप चॅट बॉट द्वारे देण्याचा प्रयत्न • माय बीएमसी टिव्टर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत हे पुढचे पाऊल हा दुहेरी संवाद, अडचणीचा सर्वस्तरावर पाठपुरावा होणार. • या द्वारे मुंबईकराचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न • आज हे जगातील एकमेव उदाहरण असेल की 80 पेक्षा जास्त सुविधा आपण नागरिकांना देत आहोत • ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Mumbai, Uddhav thackeray, Whats app news

पुढील बातम्या