मुंबई, 14 जानेवारी: मुंबईत कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच कोरोना लसीकरण (Vaccination) खूप प्रभावी असल्याचं वक्तव्य मुंबई पालिका आयुक्त (BMC commissioner Iqbal Singh Chahal)इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे. त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 1900 पैकी 96 टक्के ऑक्सिजन बेड (Oxygen Beds)अशा रुग्णांना आवश्यक आहेत ज्यांनी लसीचा (Vaccine) पहिला डोस देखील घेतला नाही.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत (Third Wave) पॉझिटिव्हीटी दराच्या आधारे निर्बंध किंवा लॉकडाऊन लादले जाणार नसल्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. या वेळी मुंबई पालिका निर्बंध लादण्यासाठी रुग्णांच्या भरती होण्याचा दर आणि ऑक्सिजनचा वापर याच्याआधारे विचार करेल.
हेही वाचा- मोबाईल खरेदीसाठी हवे होते 20 हजार, आईनं नकार देताच मुलानं उचललं टोकाचं पाऊल
चहल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मुंबईतील 186 रुग्णालयांच्या ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या 96 टक्के रुग्णांना कोरोनाची लस मिळालेली नाही. ज्या रुग्णांना लस मिळाली आहे ते आयसीयूमध्ये दाखल होत नसल्याचंही आपण पाहिले आहे. आमच्याकडे सध्या 21 लाख लसींचा साठा आहे. यावेळी सर्वात मोठे आव्हान म्हणजे संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करणे. दोन्ही डोसमधील 84 दिवसांचे अंतर हे देखील या आव्हानाचे एक मोठे कारण असल्याचंही इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.
गेल्या 16 दिवसांत 19 रुग्णांचा मृत्यू
चहल म्हणाले की, बीएमसीने आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं आहे. त्यापैकी 90 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. चहल पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेत रुग्णालय आणि ऑक्सिजनचा वापर वाढेपर्यंत निर्बंध लादले जाणार नाहीत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत चहल म्हणाले की, गेल्या 16 दिवसांत 19 मृत्यू झाले आहेत, परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मुंबईत सध्या एक लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत पण रोज फक्त 10 टन ऑक्सिजन वापरला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Mumbai case