जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शिवसेनेवर आता आणखी एक नवं संकट, उद्धव ठाकरेंचं पद धोक्यात? उरले फक्त 12 दिवस!

शिवसेनेवर आता आणखी एक नवं संकट, उद्धव ठाकरेंचं पद धोक्यात? उरले फक्त 12 दिवस!

 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना

23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना

23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी : शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे मंगळवारी सुनावणी पार पडली पण अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपत आली आहे. अवघे बारा दिवस उरले आहे. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना शिवसेनेत चिंतातुर वातावरण पसरले आहे. ( अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया ) पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची आयोगाला विनंती करणार आहे. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीमध्ये तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं निवडणूक होते. वर्षानुवर्षे ही निवडणूक होत आली आहे. १९६६ पासून शिवसेना रजिस्टर्ड पक्ष आहे. १९६६ नंतर सर्व निवडणूका शिवसेनेनं लढवल्या आहेत. १९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं. लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. (हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईने संजय राऊत संतापले, शिंदे सरकारला विचारला थेट सवाल) राजकीय पक्ष आणि विधिमंडळ सदस्य यावर युक्तीवाद झाला. शिंदे गटाकडून विधिमंडळ सदस्यांवर भर देण्यात आला. तोच ग्राह्य धरावा असं त्यांनी सांगितलं. पण कार्यकर्ता, पदाधिकारी असणे म्हणजे, पक्ष हे आमचं म्हणणं आहे. २०१८ मध्ये लोकशाहीची मूल्य तुडवली गेली किंवा एकाधिकारशाही आहे हे त्याचं म्हणणं धादांत खोटं आहे. पण निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन, सर्व प्रक्रिया पार पाडूनच कार्यवाही केली. त्या संदर्भात सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली. प्रतिनिधी सभा, त्यात किती सदस्य त्यांचे नंबर काय हे सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. राजकीय पक्ष म्हणून काय आहात हे निवडणूक आयोगानं विचारलं होतं. त्यासाठी दस्ताऐवज आम्ही अगोदरच दिलं आहे, असंही देसाईंनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात