जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईने संजय राऊत संतापले, शिंदे सरकारला विचारला थेट सवाल

हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईने संजय राऊत संतापले, शिंदे सरकारला विचारला थेट सवाल

हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईने संजय राऊत संतापले, शिंदे सरकारला विचारला थेट सवाल

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापेमारी केली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी :  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी छापे पडले आहेत. मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची धाड पडली. आज सकाळी सहा वाजेपासून ईडीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. ईडीकडून सध्या हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुश्रीफ हे लढवय्या नेते असून, ते यातून लवकरच बाहेर पडतील असं म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?  आज सकाळी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. फक्त विरोधकांवरच कारवाई का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुश्रीफांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. मात्र मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत, त्यांनी संघर्ष पाहिला आहे. ते या संकटाचा धिराने सामना करतील आणि लवकरच या सर्वांमधून बाहेर पडतील असं राऊत यांनी म्हटलं आहे. मुश्रीफांच्या भागीदारांवर छापेमारी   दरम्यान दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्यावरच नाही तर त्यांचे व्यवसायीक भागीदार असलेल्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला आहे. कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर छापेमारी सुरू आहे.  चंद्रकांत गायकवाड हे मुश्रीफांचे भागीदार आहे. तर,  मुश्रीफांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांच्या घरावरही छापा पडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात