मुंबई, 11 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात ईडीने कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. (हसन मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईने संजय राऊत संतापले, शिंदे सरकारला विचारला थेट सवाल) हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. परंतु आता ईडीने धाड टाकली आहे, असे समजते. यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. (Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या कारवाईने कागलमध्ये खळबळ, तासाभरात बंद, मुश्रीफ दुपारी बोलणार) दरम्यान, मुश्रीफ यांच्या मुलाच्या घरावरही छापे पडले होते. ईडीने पुण्यात सुद्धा छापे टाकले आहे. पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर छापे टाकले आहे. कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड हे मुश्रीफांच्या भागीदार आहे. तर, मुश्रीफांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांच्या घरावर ही छापा पड ला आहे. सांगाव रोडवरील त्यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले आहे. या प्रकरणामुळे झाली मुश्रीफ यांच्यावर कारवाई - कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण - कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवल्याचा आरोप - घोटाळ्यात मुश्रीफांचे जावई मतीन मंगोली यांचाही सहभाग असल्याचा आरोप - कारखाना काही वर्षांपूर्वी ब्रिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला.. - ब्रिस्क इंडिया कंपनी जावई मंगोलींच्या मालकीची - व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार केली - या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे ब्रिस्क इंडिया कंपनीत वळवल्याचा आरोप - ब्रिस्क इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही - कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नसल्याचा आरोप - कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी ब्रिस्क इंडिया कंपनीच का किरीट सोमय्यांचा सवाल - मुश्रीफ आणि जावयांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप - याच घोटाळ्या प्रकरणी ईडीमार्फत आज छापेमारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.