जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मिशन 2024! 'संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय'; माजी आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश

मिशन 2024! 'संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय'; माजी आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश

मिशन 2024! 'संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय'; माजी आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश

संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, असं उद्धव ठाकरे माजी आमदारांना म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली होती. आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आलेली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांशी संवाद साधला (Uddhav Thackeray). 2024 निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले आहेत. एकत्रच लढूया, शरद पवारांनी दिली शिवसेना-काँग्रेसला साद, शिंदे सरकारला देणार टक्कर? या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार उपस्थित होते. तयारीला लागा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांना दिले आहेत. संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, असं उद्धव ठाकरे माजी आमदारांना म्हणाले. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये NDA च्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहिर केलं आहे. यापूर्वीसुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या गटात कसे येतील यासाठी शिंदे गटाने फिल्डिंग लावली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही बैठकीचा सपाटा सुरू केला आहे. shiv sena uday samant : शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंतांच्या पत्राने नवी चर्चा एकंदरीतच ४० आमदार फुटल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी शिवसेनेने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांना विश्वास दिला आणि सांगितलं की आपल्याला पुन्हा शिवसेना उभी करायची आहे. त्यासाठी एकनिष्ठ राहाण्याची गरज आहे. जे सोडून गेले त्यांची पर्वा करायची नाही, जे सोबत आहेत त्यांच्यासाठी काम करायचं आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात