जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / shiv sena uday samant : शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंतांच्या पत्राने नवी चर्चा

shiv sena uday samant : शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंतांच्या पत्राने नवी चर्चा

shiv sena uday samant : शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? उदय सामंतांच्या पत्राने नवी चर्चा

शिवसेनेतील (shiv sena 40 mla rebel) 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे (shiv sena uddhav thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : शिवसेनेतील (shiv sena 40 mla rebel) 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे (shiv sena uddhav thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीसरकार (mahavikas aghadi) पायउतार झाले. या सगळ्या राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेना (shiv sena) आणि बंडखोर आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. काही जिल्ह्यात बंडखोरी केलेल्या आमदारांच्या पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेण्याचे काम सुरू आहे. (shiv sena uday samant and shiv sena mp vinayak raut 

जाहिरात

याचबरोबर काही आमदार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (uddhav thackeray and eknath shinde) आणि भाजपाशी जुळवून घ्यावे असे सल्ले देत आहेत. दरम्यान बंडखोर आमदार उदय सामंत यांनी शिवसैनिकांना पत्र लिहत आवाहन केले आहे. त्यानी दिलेल्या पत्रात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि वाघाचा फोटो आहे. मात्र उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने पुन्हा चर्चा रंगली आहे. शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कारस्थान करत आहे का? याचा जाहीर खुलासा उदय सामंत यांनी पत्रातून केला आहे.

हे ही वाचा :  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

सामंत यांनी लिहलेले पत्र

पत्र प्रपंच एवढ्यासाठीच, काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा, राजापूर व संगमेश्वरचे शिवसैनिक जास्त होते, असो. मेळाव्याची सुरुवात विभाग प्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेत्यांची भाषणे सुरू झाली अनेकांनी मला टोमणे मारले. पण ती काही मंडळी कोण होती? ज्यांनी खा. विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले. काहींनी प्रचाराची पत्रकेदेखील गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही असे जाहीर वर्तमान पत्रातून दिले होते.

जाहिरात

माझा कोणावरच राग नाही पण दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांना आपलं मानलं, राजकारणापलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपले अशा व्यक्तीने मला गद्दार, उपरा अजून बरेच काही म्हणणं मला रुचले नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील झालो तो एक शिवसैनिक म्हणूनच. ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला.

News18

हे ही वाचा :  सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

जाहिरात

ज्यांनी बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली. त्या व्यक्तीच्या विरोधात हा उठाव होता. हा उठाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही शिवसेनेला राज्यात चौथ्या क्रमांकावर जावं लागतं त्यासाठी होता. विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांविरोधात हा उठाव होता. जी लोकं उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा फायदा घेत शिवसेना संपवू पाहणाऱ्या वत्तीविरोधात हा उठाव होता. माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता याला गद्दारी म्हणायची की धाडस हे आपणच ठरवा.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात