Home /News /crime /

मोठी बातमी! शिवसेना आमदार रविंद्र वायकरांची तब्बल 7 तास ईडी चौकशी

मोठी बातमी! शिवसेना आमदार रविंद्र वायकरांची तब्बल 7 तास ईडी चौकशी

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल सात तास चौकशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई, 21 डिसेंबर : शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल सात तास चौकशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वायकर हे फडणवीस सरकारच्या काळात गृहिनिर्माण मंत्री होते. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीय सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर आज अचानक वायकरांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून वेगवेगळ्या प्रकरणांवरुन रविंद्र वायकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याआधी देखील शिवेसेनेच्या काही नेत्यांना ईडीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसुळ या शिवसेना नेत्यांचा समावेश आहे. हेही वाचा : राज्यात Omicron चा धोका वाढला, रुग्णांची संख्या पोहोचली 65 वर रविंद्र वायकर मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. या दरम्यान मातोश्री क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या आरोपांवरुन ईडीने वायकरांची सात तास चौकशी केली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर रविंद्र वायकर हे आपल्या घरी गेले आहेत. किरीट सोमय्यांनी नेमके काय आरोप केले होते? भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा रायकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर आणि ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगले असल्याचा दावा केला होता. तसेच या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला नव्हता किंवा ती माहिती निवडणूक आयोगापासून लपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच संबंधित जागेवरील एका बंगल्याची किंमत पाच कोटी इतकी होती, असा दावा सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी यांसह अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांवरुन रविद्र वायकर यांनी त्यांना मानहानीची नोटीस बजावली होती. त्यानंतर आता रविंद्र वायकर यांच्या ईडी चौकशीची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या ईडी चौकशीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या