जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / उदय सामंत यांची धडाकेबाज कामगिरी, डोंबिवलीमध्ये मध्यरात्री टँकर माफियांचा केला पर्दाफाश

उदय सामंत यांची धडाकेबाज कामगिरी, डोंबिवलीमध्ये मध्यरात्री टँकर माफियांचा केला पर्दाफाश

डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण टॅंकर माफिया असल्याचे समोर आले

डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण टॅंकर माफिया असल्याचे समोर आले

एकूण 4 ठिकाणी धाडी टाकल्या आहे. पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॅाटरचा कारखाना उभारला होता

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली, 14 मार्च : डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण भाग टँकरवर अवलंबून आहे. पण, या टँकरमाफियांचा पर्दाफाश शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मध्यरात्री डोंबिवलीमध्ये धाड टाकून बेकायदेशीर टँकर कंपनीला सील ठोकलं आहे. डोंबिवलीमध्ये टॅंकर माफियांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुद्द मंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली. सोमवारी रात्री उशिरा स्वतः अधिकारी आणि पोलिसांसह एका कंपनीवर धाड टाकली. (‘वयाच्या या टप्प्यावर…’, ‘भूषण’ शिंदेंकडे गेल्यानंतर सुभाष देसाई भावुक) कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करुन विकले जात होते. डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण टॅंकर माफिया असल्याचे समोर आले आहे. एकूण 4 ठिकाणी धाडी टाकल्या आहे. पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॅाटरचा कारखाना उभारला होता. सोबत हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधल्या होत्या. कारखाना सिल करुन टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (होमग्राऊंडवरच ठाकरे अडचणीत! देसाईंचं ‘भूषण’ शिंदेंच्या शिवसेनेत!) टॅंकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द केले आहे. टॅंकर माफियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उदय सामंत यांनी टॅंकर लॅाबीचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीमधील 27 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये टँकरनेच पाणी मागवले जात आहे. या भागांमध्ये कल्याण डोंबिवलीकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात असतो. पण, टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात टँकरचा पुरवठा केला जात आहे. नेमकं इतकं पाणी या टँकर माफियाकडे येतं कसं, असा सवाल उपस्थितीत झाला होता. अखेरीस कल्याण डोंबिवली पालिकेचं पाणी चोरत असल्याची बाब समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात