जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'वयाच्या या टप्प्यावर...', 'भूषण' शिंदेंकडे गेल्यानंतर सुभाष देसाई भावुक

'वयाच्या या टप्प्यावर...', 'भूषण' शिंदेंकडे गेल्यानंतर सुभाष देसाई भावुक

सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांना त्यांच्या होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसला आहे. मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेले आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च : उद्धव ठाकरे यांना त्यांच्या होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसला आहे. मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेले आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांच्या या प्रवेशानंतर सुभाष देसाई यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले सुभाष देसाई? ‘माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही, त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे’, असं सुभाष देसाई म्हणाले. प्रवेश करताना वडिलांशी चर्चा झाली? माझं आधी वडिलांशी बोलणं झालं होतं. मी त्यावेळीच त्यांच्या कानावर टाकलं होतं. त्यानंतर शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मी शिंदे गटात प्रवेश करणार हे ठरलं होतं. घरामध्ये कोणतेही मतभेद होत नाही. त्यांचं एवढ्या वर्षांचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे आमच्यामध्ये काही मतभेद नाही. त्यामुळे मला फार विचार करण्याची गरज नाही,’ अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली. सुभाष देसाईपण येणार? सुजय विखे यांच्याप्रमाणे त्यांचे वडील सुद्धा भाजपमध्ये आले होते, तसेच सुभाष देसाई सुद्धा शिंदे गटात येणार आहे का? असा प्रश्न भूषण देसाई यांना विचारण्यात आला. तेव्हा मी याबद्दल सध्या काही सांगू शकत नाही, माझी इतकीच मर्यादा आहे, मला तसं सांगता येणार नाही. तिकडे काय पद्धतीने काम चालू आहे, याबद्दल जास्त बोलणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात