मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

TET paper leak case : घरी 2 कोटींचं घबाड सापडलेला तुकाराम सुपेंवर अखेर राज्य सरकारची कारवाई

TET paper leak case : घरी 2 कोटींचं घबाड सापडलेला तुकाराम सुपेंवर अखेर राज्य सरकारची कारवाई

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नाही.

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नाही.

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नाही.

मुंबई, 20 डिसेंबर : टीईटी पेपरफुटी प्रकरणी (tet paper leak case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (tukaram supe) यांना अटक करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने (mva government) धडक कारवाई करत परीक्षा तुकाराम सुपेला निलंबित करण्यात आले आहे. शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपेला  अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsh gaikwad) यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध परीक्षांच्या पेपर फुटीची प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं. त्यातच थेट धागे  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या आयुक्तापर्यंत पोहोचले. अखेर राज्य सरकारने त्याचं निलंबन केलं आहे.   हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधी तुकाराम सुपे हे पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांचं वक्तव्य, VIDEO

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना आज अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या सायबर सेलने (Pune Police Cyber Cell) तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी नंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

400 कोटी ड्रग्स प्रकरणात गुजरात-पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

पण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. आरोपी तुकाराम सुपे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष आहे. याआधी सुपे याच्या घरी पोलिसांना 88 लाख रुपयांचं सोनं आणि काही रोकड मिळाली होती. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

First published: