मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांचं वक्तव्य, VIDEO

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांचं वक्तव्य, VIDEO


'आमच्या पक्षाचे 30-35 आमदार येऊ द्या, ओबीसी आरक्षणाची गमंत 10 मिनिटांमध्ये करून दाखवतो'

'आमच्या पक्षाचे 30-35 आमदार येऊ द्या, ओबीसी आरक्षणाची गमंत 10 मिनिटांमध्ये करून दाखवतो'

'आमच्या पक्षाचे 30-35 आमदार येऊ द्या, ओबीसी आरक्षणाची गमंत 10 मिनिटांमध्ये करून दाखवतो'

परभणी, 20 डिसेंबर :  'छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे ओबीसी (obc) होते, कुळवाडी भूषण राजे होते' असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (mahdev jankar ) यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे राज्यात संतापाची लाट ओसरली आहे. तर दुसरीकडे भाजपशासीत राज्यात घटना घडल्यामुळे राजकीय आखाडा तापला आहे. अशातच भाजपच्या घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गंगाखेड  इथं सुरू असलेल्या ओबीसी एल्गार आंदोलनादरम्यान सभेत शिवरायांबद्दल नवीन वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला माझी विनंती आहे, शाहु महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं, ते बाबासाहेबांना दिलं होतं, ते मराठा समाजाचे होते. मराठ्यांना आरक्षण होतं, त्यांचं आरक्षण का गेलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ओबीसी होते. कुळवाडी भूषण राजा होता, पण आमच्या तथागतीत लोकांना त्यावेळी आरक्षण नको म्हणून नाही सांगितलं अन् आज अवस्था काय झाली, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं.

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! शिवसेना युपीएत सहभागी होणार

'सामान्य लोकांना सर्वांना न्याय देण्याची विनंती करतो. आमच्या पक्षाचे 30-35 आमदार येऊ द्या, ओबीसी आरक्षणाची गमंत 10 मिनिटांमध्ये करून दाखवतो. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देतो आणि मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण देतो, असं महादेव जानकर म्हणाले.

'आज मुस्लिम समाजावर किती अन्याय होतो, गॅरेज दिसलं की मुस्लिम व्यक्ती असते, अंड्याचं दुकानं म्हटलं की मुस्लिम व्यक्ती, कोंबडीचे दुकानं पाहिलं की मुस्लिम व्यक्ती यांचा कुठे कलेक्टर नाही, ना कोणता अधिकारी नुसती बोंबाबोंब सुरू आहे. ही लोकं फक्त केळी विकता, अंडी विकता आणि काही लोक मुस्लिमांना दोष देतात. त्यामुळे हिंदू सुद्धा भिकारी आणि मुस्लिम सुद्धा भिकारी आहे अन् राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, असंही जानकर म्हणाले.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj