Home /News /crime /

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरुन ड्रग्स माफियांची भारतात एन्ट्री; 400 कोटी ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरुन ड्रग्स माफियांची भारतात एन्ट्री; 400 कोटी ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदरावरुन तब्बल 21,000 कोटी रुपयांची 3,000 किलोग्रॅम हेरोइन जप्त करण्यात आली होती.

    अहमदाबाद, 20 डिसेंबर : गुजरातमधील (Gujrat News) समुद्र मार्गातून ड्रग्स माफिया (drugs mafia) भारतात प्रवेश करीत असल्याचं दिसून येत आहे. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरुन इंडियन कॉस्ट गॉर्ड (Indian Coast Guard) आणि ATS च्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी बोटीतून 77 किलोग्रॅम हेरोइन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात 6 जणांना अरेस्ट करण्यात आलं आहे. या ड्रग्सची किंमत 400 कोटी रुपये आहे. भारतीय तटरक्षक (Indian Coast Guard) आणि  गुजरात एटीएसच्या (Gujarat ATS) निरीक्षणादरम्यान भारतीय जल भागात एक पाकिस्तानी बोट ‘अल हुसैनी’चं संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांना गुजरात किनाऱ्यावरुन काही अंतरावर पकडण्यात आलं. नोव्हेंबरमध्ये भारतीय तटरक्षकांनी 12 चालकांच्या टोळीसह एक पाकिस्तानी बोट ‘अल्लाह पवाकल’ला पकडण्यात आलं होतं. मुंद्रा पोर्टावर ऑक्टोबरमध्ये हेरोइनची मोठी खेप पकडण्यात आली होती. तेव्हापासून गुजरातवरुन नारकोटिक्स (Narcotics Control Bureau), ATS, कॉस्ट गार्ड आणि पोलीस अलर्टवर आहे. काही दिवसांपूर्वी 21,000 कोटींचा ड्रग्ज पकडला होता... यापूर्वी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय तपास एजन्सीने (NIA) गुजरातच्या मुंद्रा बंदरावरुन 3,000 किलोग्रॅम हेरोइन जप्त केल्या प्रकरणात दिल्लीहून एक अफगाण नागरिकाला अटक करण्यात आली होती. एनआयएने सांगितलं की, या अफगाण नागरिकाला 12 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात गुजरात कच्छमध्ये मुंद्रा बंदरावर हेरोइनची आतापर्यंतची सर्वात मोठी रेड पकडली होती. इंटरनेशनल मार्केटमध्ये याची किंमत 21,000 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात चेन्नईमधून दोन जणांना अटक करण्यात आली होती. मुंद्रा बंदरावरील हक्क अडानी पोर्टाजवळ आहे. या घटनेनंतर अडानी पोर्टने पाकिस्तान आणि अफगानिस्तानच्या मार्गाने येणाऱ्या मालावर बंदी आणली होती. हे ही वाचा-पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले अन् मंगळसूत्र घेऊन पळाले, नाशकातील घटनेचा CCTV मुंद्रा पोर्टबद्दल देण्यात आली माहिती... नुकतच राज्यसभेत केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीबी रेकॉर्डच्या आधारावर सांगितलं होतं की, 2988.21 किलोग्रॅम हेरोइनच्या जप्तीपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदरावरुन कोणताही ड्रग्ज जप्त करण्यात आला नव्हता. ऑक्टोबरमध्ये गुजरातच्या (Gujrat) कच्छस्थित मुंद्रा पोर्टवर हेरोइन पकडण्यात आली होती. या ड्रग्सची किंमत तब्बल 9000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. दोन कंटेनर्समध्ये तब्बल 3000 कोटी रुपयांची हेरोइन सापडली होती. 20 सप्टेंबर रोजी या अवैध ड्रग्ससह दोघांनाही अटक करण्यात आली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Drugs, Gujrat

    पुढील बातम्या