जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना

अंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना

अंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना

विशाल मेवानी हे दातदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टरकडे भेटायला वरळीतील सर पोखखनवाला रोडवरील बुएना व्हिस्टा इमारतीत गेले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 सप्टेंबर : लिफ्टखाली दबून कोहिनूर इलेक्ट्रानिकच्या मालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील वरळी भागात घडली. विशाल मेवानी (वय 46) असं त्यांचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मेवानी हे दातदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टरकडे भेटायला वरळीतील सर पोखखनवाला रोडवरील बुएना व्हिस्टा इमारतीत गेले होते. ही इमारती जुनी आहे. या इमारतीत अनेक कुटुंब राहत आहे, तसंच ज्येष्ठ नागरिकांनी संख्या जास्त असल्यामुळे यात एक लाकडी लिफ्ट बसवण्यात आली होती. शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर, संजय राऊतांसह नवीन चेहऱ्यांना संधी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेवानी यांनी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचे बटन दाबले. पण त्यानंतरही दार न उघडल्यामुळे त्यांनी ताकद लावून दार उघडले आणि आत प्रवेश केला. पण, त्यांना लक्षात आले की लिफ्ट तळ मजल्यावर नाही. मेवानी हे मध्येच अडकले गेले होते. मेवानींनी सुरक्षारक्षकाला आवाज दिला पण तो पाणी पिण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्याला आवाज ऐकू आला नाही. लिफ्ट सुरू झाली आणि मेवानी लिफ्टखाली दबून ठार झाले. मेवानी यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही जणांनी धाव घेतली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. प्लेअर्स घेतायेत PUBG चं ‘चिकन डिनर’; बंदीनंतरही तरुण मोबाइलमध्ये व्यस्त लिफ्ट तळ मजल्यावर खाली आल्यानंतर मेवानी जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने  ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केले, तेथे दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: worli
  • First Published :
जाहिरात
जाहिरात