Home /News /national /

प्लेअर्स घेतायेत PUBG चं 'चिकन डिनर'; बंदीनंतरही तरुण मोबाइलमध्ये व्यस्त

प्लेअर्स घेतायेत PUBG चं 'चिकन डिनर'; बंदीनंतरही तरुण मोबाइलमध्ये व्यस्त

चीनविरोधात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताने चिनी कंपनीचा पबजी या खेळावर बंदी आणली आहे, मात्र..

    नवी दिल्ली, 8 सप्टेंबर :  गेल्या 2 सप्टेंबर रोजी भारत सरकारने PUBG Mobile सह 118 अॅप्सवर बंदी आणली आहे. भारतात मल्टीप्लेयर बॅटल रॉयल गेमचे अनेक वापरकर्ते होते आणि गेमवर बंदी आणल्यानंतर त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. हा गेम आता गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोर्समधून हटविण्यात आला आहे. मात्र ज्या स्मार्टफोन्समध्ये PUBG Mobile याआधीपासून इन्स्टाॅल आहे, त्यात आताही प्लेअर हा गेम खेळू शकतात. भारतात असे अनेक प्लेअर्स अद्यापही हा गेम खेळत आहेत. बंदी आणण्यापूर्वी ज्यांनी हा गेम इन्स्टॉल केला होता ते आजही पबजी खेळताना दिसत आहेत. भारतीय गेमर्स अद्यापही पॉप्युलर बॅटल रॉयल गेम आपल्या मोबाइलमध्ये खेळू शकतात. मात्र हे काही काळापूरतं सीमित राहिलं. जोपर्यंत गेम डेव्हलपर्सकडून इंडियन गेम सर्वर शट-डाउन करण्यात येत नाही, तोपर्यंत हे सुरू राहिल. मात्र एकदा गेम ब्लॉक केल्यानंतर प्लेयर्स नवीन मॅच सुरू करू शकणार नाहीत. सर्वर केव्हा शट-डाउन केलं जाईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. गेम डेव्हलप करणारी कंपनी Tencent चं म्हणणं आहे की परिस्थिती सुधारण्यासाठी ते सरकारशी बातचीत करतील. जिंकणं झालंय सोपं अनेक गेमर्स जेथे PUBG Mobile सारखे दुसरे खेळ - उदा Call of Duty: Mobile आणि Gerena Free Fire वर शिफ्ट झाले आहेत. मात्र अद्यापही काही जणं PUBG Mobile गेम खेळत आहेत. बंदी लावल्यानंतर गेममध्ये बरेच बदल झाले आहेत. प्लेयर्सनां जिंकल्यानंतर मिळणारं 'चिकन डिनर' सहज उपलब्ध होत आहे. गेममध्ये खूप बॉट प्लेयर्स भेटत असल्याने जिंकणं सोप झालं आहे. मात्र पहिल्यासारखी मजा राहिली नसल्याचंही प्लेअर्सचं म्हणणं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pubg game

    पुढील बातम्या