Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर, संजय राऊतांसह नवीन चेहऱ्यांना संधी

शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर, संजय राऊतांसह नवीन चेहऱ्यांना संधी

शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई, 08 सप्टेंबर : राज्यात महाविकास आघाडी  स्थापन करताना भाजपला सडेतोड उत्तर देणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर नेत्यांची यादीही शिवसेनेनं जाहीर केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर इतर सदस्य प्रवक्त्यांमध्ये खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.

SSR प्रकरणी नवा ट्वीस्ट, रिया चक्रवर्तीची सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार

त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनिल प्रभू यांचीही प्रवक्ते म्हणून घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यलकडून करण्यात आली आहे. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी

दरम्यान, राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणार उतरवला.शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून त्यांना भाई गिरकर हे आव्हान देतील.

45 वर्षांनंतर LACवर गोळीबार, भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चीनला मागे परतवलं

विधानपरिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र दिले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यानंतर भाजपकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरला. परंतु, महाविकास आघाडीकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सेनेचा प्रयत्न असणार आहे. पण, भाजप काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published: