मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅब चालकाला मारहाण करणं 'त्या' महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई

कॅब चालकाला मारहाण करणं 'त्या' महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई

Crime News: सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुणी किरकोळ कारणातून एका कॅब चालकाला बेदम (cab driver beaten by woman) मारहाण करत आहेत.

Crime News: सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुणी किरकोळ कारणातून एका कॅब चालकाला बेदम (cab driver beaten by woman) मारहाण करत आहेत.

Crime News: सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुणी किरकोळ कारणातून एका कॅब चालकाला बेदम (cab driver beaten by woman) मारहाण करत आहेत.

लखनऊ, 03 ऑगस्ट: सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक तरुणी किरकोळ कारणातून एका कॅब चालकाला बेदम (cab driver beaten by woman) मारहाण करत आहेत. संबंधित तरुणीनं पीडित कॅब चालकाला भर रस्त्यात तब्बल 20 पेक्षा अधिक कानशिलात (Slap) लगावल्या आहेत. संबंधित कॅब चालक हात जोडून तेथून जाण्यासाठी विनवणी करत होता. मात्र महिलेनं त्याची कॉलर पकडून बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या कृष्णनगर परिसरातील आहे. संबंधित महिलेनं कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर, स्वतः पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॅब चालक माझ्या अंगावर गाडी घालत होता. त्यामुळे मी मारहाण केली असल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पण कॅब चालकानं महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव

घटनास्थळी असणाऱ्या एका महिला वाहतूक पोलिसासमोरच कॅब चालकाला मारहाण होतं असल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. महिलेनं आरडाओरडा करत, महिलांच्या अंगावर वाहन घालतो का? असा सवाल करत भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण केली आहे. संबंधित कॅबचालक बाजूला उभा असणाऱ्यांना पोलिसांना विनंती करत असताना, संबंधित महिलेनं त्याचा फोनही रस्त्यावर आपटला आहे.

माझा फोन का तोडलास? हा फोन कंपनीनं दिलेला आहे. मी त्या ठिकाणी काम करतो. मी गरीब व्यक्ती आहे. या फोनची किंमत 25 हजार रुपये आहे. याचं बिल कोण देणार? असे कॅब चालक आरोपी महिलेला म्हणताना दिसत आहे. दरम्यान, तेथील गर्दीतील एका तरुणानं त्या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेनं अडवणूक करणाऱ्या तरुणालाही मारल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा-ताईला सासरी जाण्यास सांगितले, अल्पवयीन भावाने बापाच्या डोक्यात काठी घालून घेतला जीव

मारहाण केल्याची संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या व्हिडीओमध्ये महिला रस्त्यावरून चुकीच्या पद्धतीनं रस्ता ओलांडताना दिसत आहे. सिग्नल सुटल्यानंतर वाहनं वेगानं जात असताना, महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. दरम्यान ही महिला कॅबला आडवी आली, यावेळी कॅब चालकानं जोरात ब्रेक दाबला. कारचा धक्काही लागला नाही.तरीही महिलेनं चालकाल बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Beating retreat, Crime news, Uttar pardesh