मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पटेल स्टेडियमचे नाव बदलणाऱ्यांनी संभाजीनगरबद्दल विचारू नये, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

पटेल स्टेडियमचे नाव बदलणाऱ्यांनी संभाजीनगरबद्दल विचारू नये, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

' पाठ थोपडून घेण्यासाठी काम करण्याची छाती लागत असते'

' पाठ थोपडून घेण्यासाठी काम करण्याची छाती लागत असते'

' पाठ थोपडून घेण्यासाठी काम करण्याची छाती लागत असते'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 03 मार्च : औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajingar)  कधी करणार अशी विचारणार भाजप (bjp) करत आहे. पण ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव (Prime Minister Narendra Modi) दिले आहे, त्यांनी आम्हाला विचारू नये, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेत्यांना लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण करत भाजपच्या नेत्यांना चांगलेच झोडपून काढले. भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले. 'सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्यात आले आहे आणि आपले नाव दिले आणि आम्हाला विचारताय औरंगाबादला संभाजीनगर द्या, पण आम्ही औरंगाबादचे नामकरण  संभाजीनगर हे नक्की करूच, पण त्याआधी या विधानसभेत संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचे ठरले होते, त्याची तारीख कधी दिली जाणार आहे हे सांगा, उगाच आम्हाला हिंदूत्व शिकवू नका' असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या हे दोन वेळा पत्र केंद्र सरकारला दिले आहे. मुळात भारतरत्न देण्याची प्रक्रिया कोण पूर्ण करत असतो. मग केंद्रात बहुमतात सरकार असताना सावकर यांना  इतक्या दिवस झाले भारतरत्न का दिले नाही' असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. 'सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण जणू नटसम्राट' 'सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे. तुमच्या भाषणाचा आवेश पाहून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटायला लागली की आमचं  काय होणार, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच, 'मी सुद्धा फोटोग्राफी करतो. तुमच्यातील कलाही अशीच कायम राहु द्या. ती उचंबून आली पाहिजे. कला कुठेही लपून राहता कामा नये कला ही जन्माजात असली पाहिजे. ती जिवंत असली पाहिजे' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे - पाठ थोपडून घेण्यासाठी काम करण्याची छाती लागत असते राज्यपाल यांनी निपष्पातीपणाने भाषण केले आहे. राज्य सरकारची संपूर्ण कारकिर्द मांडली आणि ते सुद्धा मराठी मांडले आहे. ते मुद्दे काही जणांना पचवणे अवघड गेले आहे. - अचानक पाऊस आला की आपण भिजून जातो असं काही जणांचे झाले. - पाच रुपयांमध्ये थाळी देण्यात आली. मी राष्ट्रपतींचं भाषण पाहिलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत  8 महिन्यात 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात आले आहे. मग आठ महिन्यानंतर अचानक ते श्रीमंत झाले आहे का, त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरचे दर वाढवले आहे. - आम्ही 5 रुपयांमध्ये शिवभोजनाची थाळी देत आहोत. आम्ही भरलेली  थाळी दिली फक्त वाजवण्यासाठी थाळी दिली नाही. गरिबांना विचारा भरलेली थाळी पाहिजे की वाजवायला थाळी पाहिजे. - फडणवीस यांनी राज्यासाठी एकत्र येण्याचे आश्वासन दिले आहे. चला मग दिल्लीत जाऊया कर्नाटक सरकारने कशी बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी माणसावर अन्याय केला, त्याची तक्रार करूया. केंद्राकडे जाऊन कानडीच्या सक्तीबद्दल सांगू - मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडेला आहे.  मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे काय द्यायचंय ते सगळं दिले आहे. आम्ही काय भिकारी आहोत का कटोरा घेऊन प्रत्येक वेळा दिल्लीच्या दरबारात जायचे. मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा न देणे हा केंद्राचा करंटेपणा आहे. - स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या हे दोन वेळा पत्र आहे. भारतरत्न कोण देत असतो, मग इतक्या दिवस का दिले नाही. सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्यात आले आणि आपले नाव दिले, आणि आम्हाला विचारताय औरंगाबादला संभाजीनगर द्या, आणि संभाजीनगर हे नाव नक्की देऊ, पण त्याआधी या विधानसभेत संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचे ठरले होते, त्याची तारीख द्या, आम्हाला हिंदूत्व शिकवता. - ये महाराष्ट्र के लोगो पोछलो आँख का पाणी जो झुठ बोलते हे उनकी खत्म करो बेईमानी - भाषणात यमक असले म्हणून यशाचे गमक असं फडणवीस म्हणाले होते. पण आमच्यात  कान पिळण्याची आणि काम करण्याची धमक सुद्धा आहे -मला कोणी व्हिलन ठरु देत मी माझ्या राज्याची काळजी घेणार - माझी थट्टा करायची असेल तर करा पण जनतेच्या जीवाशी खेळु नका - दिल्लीची एक टीम आमच्याकडे येऊन गेली त्यांना मी विचारलं की आमचा काही चुकलं का ? ते म्हणाले तुमची यंत्रणा थकलेली आहे. - लस घ्यायला लोक येतायंत, काही गोंधळ झाला थोडा ॲपचा - लसीकरणाची क्षमता वाढवली, खासगी रुग्णालयांची संख्या वाढली -पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आहे, त्याची पण काळजी घेतली पाहिजे - त्यांची वीज कापली गेली, शौचालयं तोडली जातायंत - शेतकरी राजधानीत येऊ नये म्हणून खिळे लावले होते - शेतक-यांसाठी खिळे आणि चीनसाठी पळे - शेतकरी अतिरेकी आहे ? - तुमची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात नव्हती - माझं आजोळ विदर्भ माझ्यापासून तोडू नका - बाळासाहेबांचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नव्हतं - बाबरी पाडल्यावर येरे गबाळे पळून गेले बाळासाहेब उभे राहिले - जम्मु काश्मीर मध्ये फुटीरत्यांसोबत सत्तेत बसलात तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व
First published:

Tags: Mumbai, PM narendra modi, State budget session, Sudhir mungantivar, Uddhav thackeray

पुढील बातम्या