जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरे सरकार संकटात! एकनाथ शिंदेसह हे आमदार सूरतमध्ये

ठाकरे सरकार संकटात! एकनाथ शिंदेसह हे आमदार सूरतमध्ये

ठाकरे सरकार संकटात! एकनाथ शिंदेसह हे आमदार सूरतमध्ये

MLC Election 2022: आता शिवसेनेचे एकनाथ शिंदेही नॉट रिचेबल (Eknath Shinde Not Reachable) असून ते 11 आमदारांसोबत गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 जून : विधान परीषद निवडणुकीच्या निकालानंतर (MLC Election Result) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. राज्यात बैठकांचं सत्र जोर धरत आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची अनेक मतं फुटलेली आहेत. अशात आता शिवसेनेचे एकनाथ शिंदेही नॉट रिचेबल (Eknath Shinde Not Reachable) असून ते 11 आमदारांसोबत गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचं समोर आलं आहे. यात साताऱ्याचे आमदार महेश शिंदे, सांगोला आमदार शहाजी पाटील, माजी वनमंत्री संजय राठोड, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, ज्ञानराज चौघुले, तानाजी सावंत, अब्बदुल सत्तार यांचा फोन नॉट रिचेबल आहे. यामुळे हे सर्व आमदार सूरतमध्ये एकनाथ शिंदेंसोब असल्याचं बोललं जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील काल मुंबईला गेले होते. तेव्हापासून फोन नॉट रिचेबल आहेत. ते कुठे गेलेत कोणालाही माहिती नाही. काल रात्रीपासून ते संपर्कात नाहीत. त्यांना निवडून आणण्यात फडणवीसांनी भरपूर प्रयत्न केलेत त्यामुळे ते फडणवीसांसोबत गेल्याचा समर्थकांचा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात