मुंबई, 25 मे: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची (MLAs appointed by Governor) यादी गहाळ झाल्यामुळे वाद पेटला होता. पण, ती यादी राज्यपालांकडे (governor bhagat singh koshyari) असल्याचा खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. यावरून राजभवनात किती ढिसाळपणा आहे हे दिसून येत असून राज्यपालांनीच यादी दाबून ठेवली होती हे सिद्ध होत आहे, अशी थेट टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल नियुक्त आमदार मुद्दा आणि आरक्षणाच्या मुद्यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल चढावला.
'राज्यपालांच्या कार्यालयामध्ये किती ढिसाळपणा आहे हे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून यादीवर सही करण्यात आली नाही आणि अचानक यादी गायब असल्याचे सांगण्यात आले. राज्यपाल भवन हे भाजप चे कार्यालय झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे की राज्यपाल म्हणाले मला जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोवर मी सही करणार नाही. याचा आर्थ राज्यपालांनी ही यादी दाबून ठेवली आहे', अशी थेट टीका नाना पटोले यांनी केली.
VIDEO: 'भाऊ समजून माफ करा', आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी
'मराठा आणि धनगर आरक्षण हे भाजपचे पिल्लू आहे. ही दोन्ही आंदोलन पेटवून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न केला जातोय. त्याला हे दोन्ही समाज भिक घालणार नाही, अशी जळजळीत टीका नाना पटोलेंनी केली.
'माझे कॉल रेकॉर्ड होत आहे. हे आता संयुक्त समिती समोर न्यावे, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल' असा दावाही नाना पटोले यांनी केला.
BREAKING : फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाली का? उदय सामंत यांनी केला खुलासा
'पदोन्नती आरक्षणाबद्दल जो निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याला नितीन राऊत यांनी विरोध केला आहे. हा निर्णय परस्पर घेतला गेला, असं त्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणी न्यायालयाने अश्या प्रकारच्या सर्व याचिका एकत्र केल्या आहे. या निर्णयाबाबत आज न्यायालयामध्ये पण सुनावणी होत आहे, त्यावर लवकरच काय ते कळेल, असंही नाना पटोले म्हणाले.
12 आमदारांची यादी सापडली
राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही असा दावा माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आलेल्या अर्जावर करण्यात आल्यानंतर न दोन-तीन दिवस झाले राजभवनाच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून टीका करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडून देखील विधान परिषद सदस्य नामनियुक्त यादी देण्यात आली होती. पण तरीदेखील मंजूर करण्यात आली नाही, आता गायब झाली असे उत्तर का देते आहेस अशा स्वरूपाची टीका करण्यात आली. अखेर या प्रकरणावर राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे.
राजभवनाकडे विधान परिषद 12 सदस्यांची यादी आपल्याकडे आहे, असा दावा राजभवन सूत्रांनी दिली. यादी हरवली नाही, विनाकरण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावे नव्हती त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावे नाहीत, असे उत्तर दिले, अशी सारवासारव राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली, असे राज्यभवनातील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole