मुंबई, 25 मे- सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. हा शो कधी स्पर्धकांमुळे, कधी परीक्षकांमुळे तर कधी होस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतो. नुकताच शोचा होस्ट (Host) आणि गायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) अलिबागवर एक वादग्रस्त विधान केल होतं. त्यामुळे मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी नाराजी व्यक्त करत, आदित्यला चांगलचं खडसावलं होतं. त्यांनतर आता आदित्यने नम्रपणा दाखवत अलिबागकरांची माफी मागितली आहे.
नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’ चा एक एपिसोड प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये होस्ट आदित्य नारायण मजे मजेत एका बॅकस्टेज आर्टिस्टला टोला लगावतो आणि त्याला म्हणतो ‘मी काय अलिबागवरून आलोय का’? त्याच्या या वक्त्याव्यावर अमेय खोपकर यांनी आक्षेप घेत, आपल्या सोशल मीडियावर त्याची कानउघडणी केली होती.
आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी pic.twitter.com/UbWyB9UyyE
— News18Lokmat (@News18lokmat) May 25, 2021
या सर्व प्रकरणानंतर आदित्य नारायणने आपली चूक मान्य करत, समस्त अलिबागकरांची माफी मागितली आहे. आदित्यने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे, ‘मी सर्व अलिबागकरांची हात जोडून माफी मागतो. तुम्हा सर्वांच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मात्र माझ्या वक्तव्याने नकळत ते घडलं. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मला स्वतःला अलिबाग खूप जवळचं आहे. माझ्यासुद्धा अनेक आठवणी अलिबागशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे चुकून माझ्याक्दुन्जे झालं त्याबद्दल क्षमस्व’.
(हे वाचा: ‘...तर कानाखाली आवाज काढेन’; आदित्यच्या त्या वक्तव्यावर अमेय खोपकर संतापले)
अशा आशयाची पोस्ट करत आदित्यने आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. आदित्य नारायण सतत शोमध्ये ह्युमर साठी अनेक मजेशीर विनोद करत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्याने अनेक लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. आत्ता या सर्व लोकांची माफी मागत आदित्यने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indian idol