पुणे, 23 मे: पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु झालं आहे. सरकारकडून पालिकेला कोव्हिशील्ड लसीचे 13 हजार डोस उपलब्ध झालेत आहे. त्यामुळे आज महापालिकेच्या 70 केंद्रांवर 45 वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. महापालिकेतर्फे आजच्या लसीकरणासंबंधी माहिती दिली आहे. 22 मे रोजी अपुऱ्या लस साठ्यामुळे पुण्यातील सर्व लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान शहरातल्या काही खासगी रुग्णालयांनी थेट कंपनीकडून लस खरेदी केली असल्यानं तेथेही लसीकरण सुरु आहे.
आज पुण्यात कशापद्धतीनं लसीकरणाचं नियोजन असेल यासंदर्भातली माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
केंद्र सरकारनं 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास परवानगी दिली आहे. मात्र अपुऱ्या लस साठ्यामुळे आज पुण्यात 45 वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे.
पुणे महापालिकेला मंगळवारी कोव्हिशील्डचे केवळ साडे सात हजार आणि बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झाले. डोस मिळाल्यानं दोन दिवस लसीकरण झाले. मात्र त्यानंतर सरकारकडून लस उपलब्ध न झाल्यानं शुक्रवारी आणि शनिवार असे दोन दिवस महापालिकेनं सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवली होती.
आता सिरम कंपनीकडून पुण्यात खासगी रुग्णालयांनी लस खरेदी केली आहेत. आज महापालिकेला कोव्हिशील्डचे 13 हजार डोस मिळाल्यानं 70 केंद्रांवर प्रत्येकी 10 0 डोस देण्यात आलेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.